त्या दिवस कोर्स साठी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रूप वर काही विद्यार्थी वधू वर पत्रिका मेलन करण्यासाठी चर्चा करत होते. तसे ते सर्व विवाहासाठी पत्रिका कशा जुळवायच्या हे आमच्या कृष्णमूर्ती व भाव नवमांश कोर्स मध्ये शिकलेले होतेच म्हणून मला स्पेसिफिक लक्ष द्यावेसे वाटले नाही. म्हटल करू देत त्याचं त्यांनाच.
त्या दिवस कोर्स साठी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रूप वर काही विद्यार्थी वधू वर पत्रिका मेलन करण्यासाठी चर्चा करत होते. तसे ते सर्व विवाहासाठी पत्रिका कशा जुळवायच्या हे आमच्या कृष्णमूर्ती व भाव नवमांश कोर्स मध्ये शिकलेले होतेच म्हणून मला स्पेसिफिक लक्ष द्यावेसे वाटले नाही. म्हटल करू देत त्याचं त्यांनाच.
त्या पत्रिका आणलेल्या होत्या एका विद्यार्थ्याने. लग्न राशी चे केंद्र योग होत होते व चंद्र राशीचे षडाष्टक असे अशुभ योग होत होते. त्या पैकी ज्यांनी त्या पत्रिका आणल्या होत्या त्या विद्यार्थ्याचा मला रात्री अंदाजे 10.30 नंतर व्हॉट्सॲप वर पर्सनल मेसेज आला की सर, एक शंका आहे कॉल करू का? मी हो म्हटले तसा 5 मिनिटात त्यांचा कॉल आला पण.
विद्यार्थी: सर, माझ्या ऑफिस मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला त्यांच्या लहान मुलाची पत्रिका व त्यांच्या सुनेची जन्म कुंडली विवाहासाठी जमते का ते बघण्यासाठी पाठवली आहे.
मी: मग सांगा की जसे तुम्हाला शिकवले आहे त्या प्रकारे.
विद्यार्थी: हो, त्या प्रमाणेच चेक केले परंतु दोघांच्या पत्रिकेत लग्न राशीचा केंद्र योग दिसतोय आणि चंद्र राशींचा षडाष्टक असे अशुभ योग दिसत आहेत.
मी: OK, आणि त्यांचे वैवाहिक सौख्य, संतती सौख्य चेक केलेत का ?
विद्यार्थी: हो सर, पण दोघांच्या कुंडलीत सहावे स्थान जे वैवाहिक सौख्य बिघडवणारे आहे ते active झालेले दिसत आहे मग काय सांगू?
मी: उत्तर स्पष्ट आहे की नाही जुळत मग...
विद्यार्थी: सर ही जी मुलगी आहे तिचा नवरा म्हणजे माझ्या वरिष्ठांचा मोठा मुलगा. त्याचे व हिचे लग्न 9 महिन्यापूर्वी झाले होते आणि तो नुकताच 2 महिन्यांपूर्वी वारला. म्हणून त्यांच्या सुनेचे लग्न त्यांच्या दुसऱ्या मुलाबरोबर जो सध्या अविवाहित आहे त्याच्या बरोबर करण्याचे योजत असल्याने ह्या पत्रिका मला पाठविल्या आहेत जुळते का ते बघण्यासाठी.
मी: त्यांच्या लहान मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे?
विद्यार्थी: सर, त्याच्या कुंडलीत पण वैवाहिक सौख्य खराब दिसतेय. त्याच्या पण कुंडलीत महादशा सहाव्या स्थानाची कार्येश होत आहे.
आता मात्र मोठा पेच निर्माण झाला होता. एक तर वरिष्ठांनी सल्ला मागितलेला होता आणि त्यात हे असे अशुभ योग. आपल्या समाजात इतक्या लवकर जर एखाद्या मुलीचा पती वारला तर तिला खूप दूषणे लावली जातात. पांढऱ्या पायाची, नवऱ्याला गिळणारी, इत्यादी कडू बोल स्त्रीला ऐकवले जातात परंतु त्यात त्या स्त्रीची काही चूक नसतेच. वरती अशा मुलींना द्वितीय विवाहासाठी सुद्धा पटकन कुठले स्थळ मिळत नाही...तिला नकारच पचवावे लागतात. आणि त्यात जर सासरची मंडळी जर असा चांगला निर्णय घेत असतील तर त्यांचे खरतर आभार मानायला हवेत असे माझे मत मी त्या विद्यार्थ्याला सांगितले त्याला ही पटले. पण, जर दोघांच्या ही कुंडलीत जर वैवाहिक सौख्य बिघडलेले असेल तर तुम्ही तसे तुमच्या वरिष्ठांस स्पष्ट सांगावे आणि त्यातून जो काही निर्णय घ्यावा लागेल तो त्यांनी स्वतःहून घ्यावा असा सल्ला मी त्या विद्यार्थ्याला दिला.
एकीकडे ज्योतिषांना समाजभान जागृत ठेवून दुसरीकडे भविष्यात काय पुढे घडणार आहे ह्याचे ही स्पष्ट उत्तर देण्याची गरज असते.

