योग्य वेळ साधणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली! निर्णय घेण्याची कला आणि संवादाचे महत्त्व

माझ्या भावाच्या पीएचडी चे शेवटचे वर्ष आहे आणि आता सध्या त्याचे खूप महत्वाचे रिसर्च वर्क चालू आहे आणि ते शेवटच्या टप्प्यात आहे. परवा त्याच्या रिसर्चच्या कामादरम्यान त्याला असा आढळून आला की ज्या केमिकल्स वर तो काम करत आहे ती केमिकल्स ऐनवेळी त्यांच्या प्रॉपर्टीज बदलत आहेत. म्हणजे जे ऍसिड स्वरूप समजून काम केलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीज या सॉल्ट प्रमाणे दिसत आहेत. खरंतर सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून ...
माझ्या कृष्णमूर्ती व भाव नवमांश ज्योतिष कोर्स मध्ये सध्या बेसिक लेव्हल आणि सोबत पंचपक्षी ज्योतिष शास्त्र कोर्स शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचे त्याने स्वतः अनुभवलेले आजचे मनोगत त्याच्याच शब्दात देत आहे. काही अपरिहार्य कारणाने त्याने त्याचे नाव गुप्त ठेवण्यास सांगितले असून ते तसे गुप्त ठेवण्यात आलेले आहे. परमेश्वर त्यांना ज्योतिष शास्त्रात अशीच उत्तरोत्तर प्रगतीचे मार्ग खुले करो हीच प्रार्थना !🙏
नमस्कार सर,
अनुभव फक्त सांगावासा वाटतो.
माझ्या भावाच्या पीएचडी चे शेवटचे वर्ष आहे आणि आता सध्या त्याचे खूप महत्वाचे रिसर्च वर्क चालू आहे आणि ते शेवटच्या टप्प्यात आहे.
परवा त्याच्या रिसर्चच्या कामादरम्यान त्याला असा आढळून आला की ज्या केमिकल्स वर तो काम करत आहे ती केमिकल्स ऐनवेळी त्यांच्या प्रॉपर्टीज बदलत आहेत. म्हणजे जे ऍसिड स्वरूप समजून काम केलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीज या सॉल्ट प्रमाणे दिसत आहेत. खरंतर सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून सुद्धा त्या सगळ्या पास झाल्या होत्या फक्त एक छोटी टेस्ट त्याच्याकडून मिस झाली होती आणि आता नेमका त्याचाच फरक हा दिसत होता. एवढ्या शेवटी येऊन असं होणं म्हणजे रिसर्च वर्क ची दिशाच बदलण्यासारखं होतं. त्याला खूप टेन्शन आलं पण तरीही त्याने शांतपणे विचार केला आणि मला सांगितलं. सगळा प्रकार त्याच्या गाईड च्या कानावर घालणं गरजेचं होत. पण प्रश्न होता की इतका क्लिष्ट विषय जर त्यांनी समजून नाही घेतला तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते.
मग गरज पडली योग्य वेळेची आणि त्यासाठी त्याने मला प्रश्न केला की मी गाईडला कधी सांगू.
मी नुकताच kp आणि पंचपक्षी शिकत असल्यानं मी तर खरं चक्रावलोच. पण तरी स्वामींचा नाव घेतलं आणि आजची १२.२५ ची कुंडली बघितली. शततारका राहूच नक्षत्र होता. त्यात चंद्र राहूच्या युतीत कुंभ राशीत लाभ भावात होता. त्यामुळे मी कन्फ्युज झालो. तरी एक अंदाज केला राहू चा नक्षत्र म्हणजे महत्वाचा काम नको करायला. तरी मन कुठेतरी म्हणालं की लाभातला राहू हा राहूच्या नक्षत्रात मदत करेल. पण कॉन्फिडन्स कमी असल्याने मी लगेचच पंचपक्षी कडे वळलो. त्याच्या पक्षी नुसार आज त्याचा पक्षी शुक्ल पक्षात फुल डे रुलिंगमध्ये होता. त्यात चालू वेळ त्याची रुलिंग मधे होती मग मी लगेचच वाराप्रमाणे वेळ बघून घेतली आणि त्याला कळवला की तू या वेळेच्या आत गाईडशी बोलून घे. खरंतर अजून मी बेसिक कोर्स मध्ये असल्याने प्रश्न कुंडली प्रमाणे मी कन्फ्युज झालो पण पंचपक्षी प्रमाणे मी कॉन्फिडन्ट होतो आणि तसा मी त्याला देवाचा नाव घेतला आणि वेळ सांगितली.
आणि त्याप्रमाणे तो बोलला आणि त्याचा हा भलामोठा प्रश्न अगदी चुटकीसरशी विनात्रास सुटला. गाईडनी अगदी शांत आणि योग्य मार्गदर्शन केलं आणि कोणतंही बदल न करता रिसर्चच्या कामाची पुढची दिशा सांगितली. खरंतर झालेल्या चुकीचा त्याला त्याच्या रिसर्च मधे फायदाच झाला कारण त्यामुळे त्याचे रिसर्च आर्टिकल्स वाढले.
मी केलेल्या माझ्या छोट्या आणि केविलवाण्या प्रयत्नांच्या यशाने मला खूप आनंद झाला आणि शिकत असलेली विद्या अजून जोमाने शिकायचं पाठबळ मिळालं.
आता कुंडली प्रमाणे पण बघून मी अभ्यासाचा जोर वाढविन सर.
धन्यवाद 🙏🏻

