व्यवसायच जेव्हा धोकादायक बनतो

Spread the love

आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक ग्रहाला वेगवेगळी कारकत्व दिलेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाला वेगवेगळ्या दृष्टी ही दिलेल्या आहेत परंतु ह्याचा उपयोग जातकाला व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिर्विदानी कसा करावा ह्यासाठीच आजचा लेख लिहीत आहे. आशा आहे नवीन ज्योतिष शास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल.

 

“प्रत्येकाची नियती ठरलेली असते!” हे वाक्य आपण नेहमीच वाचत/ऐकत असतो पण कधी कधी त्यावर वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर सहजपणे प्रत्येकालाच ते पटेल असे वाटत नाही.  न पटण्याचे कारण म्हणजे त्या बद्दलची उदाहरणे आपण तो पर्यंत पाहिलेली नसतात.

 

🔰 सृष्टीचा पोषण कर्ता रवी ह्याला आपल्या ऋषींनी  “अग्नी” 🔥हे कारकत्व दिलेले आहे. शिक्षित असो किंवा अशिक्षित, मुका-बहिरा असो की आंधळा, गरीब असो की श्रीमंत सर्वांना रवी सम प्रमाणात उजेड देत असतो. त्यात दुजाभाव करत नाहीत.

 

🔰 रवी बरोबरच मंगळ 🔥 व केतूस सुद्धा 🔥अग्नी हेच कारकत्व दिलेले आहे. म्हणून जेव्हा आपण जातकाच्या जन्म लग्न कुंडलीत पाहतो की रवी-मंगळ व केतू हे ग्रह जातकाच्या लग्न स्थानावर म्हणजे प्रथम स्थानावर दृष्टी टाकतात तेव्हा त्या जातकास अग्नी पासून भय निर्माण झालेले असते. अग्नी पासून त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो.

 

⚡विशेष म्हणजे अशा जातकाच्या आवडीनिवडी आपण पाहिल्यात तर अशा जातकांना ज्या क्षेत्रात ऊर्जेचा (इलेक्ट्रिसिटी, आग, गरम वस्तूंचा संबंध, केमिकल, इत्यादी) संबंध येईल अशी MSEB वायरमन, इलेक्ट्रिशिअन, बॉयलर्स, सैनिकी शस्त्रागार-तोफखाना, केमिकल फॅक्टरी, मोबाईलचे टॉवर चे काम अथवा नूक्लिअर रिसर्च किंवा तिथले काम ह्यात रस असतो.

 

काही वर्षांपूर्वी ओळखीतले काका त्यांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे करिअर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मुलगा बारावी पास आणि पुढे #बॉयलर्स अटेंडन्ट चा आयटीआय चा कोर्स करू म्हणत होता. त्याच्या पत्रिकेत सुद्धा अशीच ग्रहस्थिती होती. म्हणून जरी आवड असेल तरी हा कोर्स करू नकोस असेच सांगावे लागले.

 

माझं उत्तर ऐकल्यावर त्यांचा मूलगा थोडा नाराज दिसत होता पण गत्यंतर नव्हते.

 

#तुम्हाला काय वाटते मी त्याला बॉयलर्स अटेंडन्ट चा कोर्स  करू द्यायला हवा होता की नाही ?

 

[आज त्याच  मुलाचे   डिमार्ट मध्ये उत्तम मॅनेजर म्हणून प्रमोशन झाले आहे.]


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page