संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या वरील उक्ती प्रमाने खरंच सर्व विश्वच आपलं सध्या घर बनले आहे ह्यात दुमत नसावे, म्हणून मग घर म्हटलं की आपोआपच घरात असणारी सर्व माणसं म्हणजे आपले कुंटुब म्हणता येईल.
✍ ज्योतिष शास्त्राचा जर आपण अभ्यास केला असल्यास आपणास माहितीच असेल की एक अचुक बनविलेली जन्म पत्रिका जरी ज्योतिर्विदास दाखवली तरी त्यास कुंटुबातल्या इतर मेंबर्स चे ही भविष्य वर्तवणे फारसे कठीण नसते.
✍ तर कसं बघता येतात आपल्या कुटुंबाचे मेंबर्स आपल्या जन्म पत्रिकेवरून?
ह्यासाठी प्रथम आपण जन्म पत्रिकेतील “लग्न कुंडली” पहावयास हवी.
✔ पूर्वेला जन्मकुंडली धरल्यास पहिलं कोष्टक येते ते म्हणजे लग्न स्थान (समजण्यासाठी १ ले स्थान लिहुया) त्यावरून जातक स्वतः जातक पहिला जातो.
✔ पत्रिकेच्या डाव्या हाताला दिसणारे ( ह्याचप्रमाणे पुढील स्थाने पाहत जावीत).
दुसरे कोष्टक म्हणजे २ रे स्थान: त्यावरुन आपल्या घरात येणारे पाहुणे पाहता येतात.
✔ ३ रे स्थान: लहान भावंड
✔ ४ थे स्थान: आपली जन्मदात्री आई
✔ ५ वे स्थान: प्रथम संतान
✔ ६ वे स्थान: नोकर, पाळीव प्राणी
✔ ७ वे स्थान: भागीदार, मातुल घराणे, सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याची जोडीदारीन म्हणजे धर्मपत्नी
✔ ८ वे स्थान: शासक, पोलीस जे आपले रक्षण करतात
✔ ९ वे स्थान: आपले गुरुजन, आपले जन्मदाता पिता
✔ १० वे स्थान: सरकारी लोकं, बॉस, व्यवसायात येणारी माणसं
✔ ११ वे स्थान: मित्र मंडळी, लहान काका, हितचिंतक
✔ १२ वे स्थान: हॉस्पिटल मध्ये काम करणारे सर्व म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, इ. (खूप महत्वाचे कार्य करत असतात म्हणूनच आपण त्यांना देवतुल्य मानतो)
✍ अजून बराचश्या व्यक्ती आपण कुंडली वरून पाहू शकतो.