सर्वांनाच हवं असतं की आपली भरभराट व्हावी, चार पैसे गाठीला असावेत, सर्व सुखं मिळावीत त्या साठीच तर आपण हे सर्व करतो ना….
पण, तुम्ही कधी निरीक्षण केलेले आहेत का एखाद्या बँकेत आपण जेव्हा बँक अकाऊंट खोलतो (मग ते पर्सनल सेव्हिंग असो की बिझनेस चे करंट अकाऊंट) ते खोलल्यापासून असे काही विचित्र घडते की ज्यातून पैसे आपल्याला येतात असे स्रोत (मग ती नोकरी असो की धंदा) अचानक आटायला सुरुवात होते, कालांतराने ते बँक खाते आपोआप बंद करावे लागते किंवा त्यावर जप्ती येते. म्हणजेच मोजक्या शब्दात सांगायचे तर आपल्या उत्पन्नाचा झराच आटतो म्हणा की…
🔰 हे कधी होते माहीत आहे?
जेव्हा जातक आपले बँक खाते अशा विशिष्ट मुहूर्तावर सुरू करतो ज्यावेळेस त्याला तृतीय, अष्टम व व्यय भावाची दशा चालू असते.
अष्टम व व्यय भाव म्हणजे नुकसान करणारे भाव आहेत हे आपल्याला माहिती असेलच.
✍ मग ह्यावर उपाय काय?
- असे अनुभव येत असतील तर जी काही रक्कम असेल त्या विशिष्ट बँक खात्यात ती लगेच काढून घ्यायची किंवा गरज असल्यास बँकेचे खाते बंद करण्याचे चार्जेस भरून चक्क बँक खाते बंद करून टाकायचे.
- आपल्या कुंडली वरून / किंवा कुंडली नसेल तर प्रश्न कुंडलीतील ग्रहस्तिथी वरून कृष्णमूर्ती पद्धतीने कुठल्या बँकेत आपल्याला चांगली मदत मिळेल हे शोधून काढून बँक खाते काढावे.
कधी कधी तीच बँक ही आपल्याला मदत करणारी असू शकते परंतु बँक खाते उघडण्याचा मुहूर्त चुकलेला असतो म्हणून सर्व निराशाजनक परिस्थिती उदभवलेली असू शकते.
- आपल्याला तृतीय- षष्ठ व लाभ स्थानाची ज्या दिवशी दशा असेल त्या दिवशी कृष्णमूर्ती पद्धतीने मुहूर्त बघून नवीन बँक खाते खोलावे म्हणजे आपल्याला भरभराट येऊ शकेल.
- कामधंदा मात्र इमानदारीने करावा नाहीतर मुहूर्त काढून ही काही फायदा होणार नाही हे ध्यानात असू द्यावे.
शुंभ भवतु !