आपण खूप वेळा ऐकले असेल किंवा वाचलेले असेल की कलियुगात मंत्राचे अनुभव दुर्मिळ झालेले आहेत. हो, त्याला कारणे ही तशीच आहेत:
१. मंत्राची निवड चुकलेली असू शकते.
२. मंत्र सिद्ध केलेला नसेल.
३. योग्य रीतीने मंत्र जप केलेला नसेल
४. मंत्राचे अनुष्ठान नीट केलेले नसेल
५.कोणताही अशुद्ध मंत्र पुस्तकातून किंवा यूट्यूब वरून घेऊन जप केलेला असेल
अशा एक ना अनेक त्रुटी असतील तर मंत्राचे अनुभव कसे येणार ?
उलट शास्त्रात म्हंटले आहे की कलियुगात फक्त जपच तुम्हाला तारील.
“नाम जप” पण एक मंत्र प्रकार आहे. कलियुगात मंत्र व त्या अगोदर यंत्र असे प्रामुख्याने जातकास फल मिळण्या च्या दृष्टीने साह्यभूत होतात हे आपण जाणताच.
सध्याच्या काळात ही मंत्राचे अनुभव निश्चित येतात. याचा अनुभव मी व माझ्या विद्यार्थ्यानी अनेक वेळ घेतलेला आहे.
त्यातील काही अनुभव वाचकांसाठी येथे लिहीत आहे.
मंत्राचा अनुभव घेण्यासाठी घेणारा व देणारा दोघांमध्ये संपूर्ण विश्वास असणे फार गरजेचे असते.
एका महिला जातकाला काही मोठ्या टेन्शन मुळे रात्री झोपच येत नव्हती. पण दिवसा ह्या जातक झोपेत असायच्या. रात्र रात्र ह्या खोलीतून त्या खोलीत येरझाऱ्या घालायच्या. त्या मुळे घरातील कामे खोळंबली की घरातले वातावरण अस्थिर व्हायचे. इतर फॅमिली मेंबर्स ना वाटायचे की नेहमी पटकन पडल्या पडल्या झोपणाऱ्या जातकाला झोप येत नाही हा बहाणा झाला. काहीतरी खोटं बोलत असेल. डॉक्टर कडे जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्या तर त्याची सवय लागू शकते. वेळ प्रसंगी टेन्शन असेल तर होत्याचे नव्हते ही होऊ शकेल. म्हणून झोपेच्या गोळ्या घेण्याचा विचार टाळला. मला प्रश्न विचारला गेला की जरा बघा…काय नक्की होत आहे?
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती नुसार मोठे आजारपण तसे काही दिसत नव्हते. पण उपाय तर हवाच होता म्हणून मी आमच्या “उपयोगी मंत्र व यंत्र शास्त्र कोर्स” मधील खालील मंत्र त्या महिलेस विशिष्ट प्रकारे जपायला सांगितला.
मंत्र:
या देवी सर्व भूतेशु निद्रारुपेन संस्थीतः I
नमस्तये नमस्तये नमस्तये नमोनमः II
आणि आश्चर्य म्हणजे फक्त एक दिवस जपून सुद्धा त्या रात्री पासून पहिल्या सारखीच झोप त्या महिलेस यायला सुरुवात झाली. पूर्ण झोप लागल्यामुळे मन स्थिर झाले, आनंदी झाले. काम करण्यास उत्साह वाढायला लागला.
वरील मंत्रा प्रमाणे वाचकांनी जर रात्री सुक्त जरी एकवेळेस दोनदा वाचले तरी त्यांना झोप येते असा माझा अनुभव आहे. जो मी एका कोल्हापूर च्या जातकास सांगून त्याची रोजची झोपेची गोळी घेण्याची सवय पुढे पुढे बंद केली होती.
प्रत्येक शब्द मंत्र च असतो फक्त तो कसा, कुठे केव्हा बोलायचा हे शिकणे जास्त important.