५ एप्रिल, २०२१ ला एका लेडी डॉक्टर जातकाची कुंडली आलेली.
प्रश्न होता की आम्ही खूप ट्राय केला पण लग्नच जमत नाही, प्लीज बघा नक्की काय योग आहेत.
कुंडली वर-वर खरच चांगली म्हणावी अशीच. शुक्र पण जन्म कुंडलीत सप्तम स्थानात कर्क राशीत वर सध्या चालू शुक्राची दशा म्हणजे शुक्र सप्तमाचा कारक होत होता मग लग्न का नाही झाले अद्याप ?
तसे बघायला गेले तर डॉक्टर असल्याकारणाने स्थळे तर पुष्कळ येत होती. आता पर्यन्त लग्न ही व्हायला पाहिजे होते पण कुठेतरी योग आड येत असावा म्हणून मुद्दाम सखोल अभ्यास केला.
🔰 शुक्र महादशा ०५ डिसेंबर, २००२ ते २०२२ पर्यन्त आहे. शुक्र बुधाच्या नक्षत्रात, शनि च्या सब मध्ये व गुरु च्या सब सब मध्ये होता.
बुध नवम व षष्ठ स्थानाचा कारक तर गुरु ३/ ८,१२ चा कारक. गुरु केतू च्या नक्षत्रात तर केतू स्वतः लग्न कुंडलीत षष्ठ स्थानात.
शुक्राचे वरील कार्येशत्व बघता शुक्र स्वतः जरी सप्तमात असला तरी लग्न करून देण्यास असमर्थ सिद्ध होतो म्हणूनच शुक्र महादशेत जातकाचे लग्न झाले नाही.
म्हणून पुढची महादशा रवी ची बघावयास हवी….
🔰 महादशा स्वामी रवी कस्प कुंडलीत अष्टमात तर लग्न कुंडलीत भाग्यात. रवी शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र वर सांगितल्या प्रमाणे सप्तमात.
जरा अजून सुक्ष्म बघितले तर कृष्णमूर्ती पद्धतीने सप्तम कस्प चा उप नक्षत्र स्वामी शनि व्यय भावात असून तो रवी च्या नक्षत्रात असून रवी शुक्राच्या उप-नक्षत्रात आणि शुक्र सप्तमात. म्हणून रवी महादशेत म्हणजे ०५ डिसेंबर, २०२२ नंतर लग्न होईल.
☀ लग्नाला उशीर होत असला तरी एक गोष्ट चांगली होती की नवरा श्रीमंत मिळणार होता त्यात त्याचे स्वतःचे हॉस्पिटल ही होण्याची दाट शक्यता दिसत होती.
“लग्नाला एक वेळ उशीर झाला तरी चालेल पण स्थळ चांगले मिळाले पाहिजे” ह्याच मुद्द्यावर जातकाच्या आईवडिलांचे तूर्तास समाधान होत होते.