विवाह कधी होईल किंवा संत्तती कधी होईल हा प्रश्न सहसा जास्त वेळेस जातक विचारतात. दिसायला प्रश्न एक च दिसत असला तरी त्यात अनेक छुपे प्रश्न लपले आहेत. कुंडली वरून ग्रहयोग पाहून ही ते सांगता येते अगदी निश्चित काळ ही कृष्णमूर्ती पद्धती वरून सांगता येतो.
( ज्यांची जन्मतारीख वेळ निश्चित माहीत नाही त्यांनाही प्रश्नकुंडली द्वारे उत्तर देता येते. ज्यांना पत्रिका/जन्म डिटेल्स माहीत आहेत त्यांनी प्रश्न कुंडली वरून प्रश्न बघू नये. उत्तराची प्रचिती येत नाही.)
“आपणास आश्चर्य वाटेल की हजारात एकाद्या व्यक्तीला मुलंबाळ होतच नाही अगदी वैद्यकीय दृष्टया दोष नसतील तरी तसच कुणाचं लग्नच होत नाही कितीही सुंदरतेचे वरदान मिळाले असेल तरीही.”
त्यामुळे सर्वप्रथम ज्योतिषाने पहावे की येणाऱ्या जातकाच खरच लग्न होणार की नाही/ मुलं होण्याचा खरच योग आहे की नाही अन्यथा खोटी आशा देणं निव्वळ व्यर्थ. नाहीतर कितीतरी जातक खोटी आशा घेऊन मांत्रिक तांत्रिक, मुल्ला मौलवी ना भेटून व्यर्थ पैसा व वेळ नाहक घालवत बसतात (त्यात भर म्हणून की काय सध्या काही *** संस्थांचे जाळे त्यांच्या लाखांवर फी सकट फोफावले आहे ) व सरतेशेवटी निराश होतात व ज्योतिष शास्त्रा वरचा विश्वास गमावतात. पण शास्त्र हे बरोबरच असते किंबहुना ते पाहणाऱ्याची चूक होऊ शकते. कारण अजून पर्यंत कितीतरी असे ज्योतिष शास्त्रा बद्दल नियम आहेत की ते सर्वानाच माहीत असतील असे नाही किंबहुना नाहीच. सर्व ज्योतिष शास्त्रा चा पूर्ण अभ्यास कुनीही केला असण्याची सुतराम शक्यता ही नाही कारण त्याची व्याप्ती च अभाळाएव्हढी आहे. अनुभवित नियम अवगत असणाऱ्या जाणत्या लोकांनी विद्या घरण्यातच रहावी म्हणून ती फक्त घराणेशाहीची मक्तेदारी बनवली परंतु काही कारणाने काळाच्या ओघात ती त्यांच्या बरोबरच लोप पावली आहे. मानवाच्या स्वभावाप्रमाणे कोणताही गुरू युगातील शिष्यास कधीच पूर्ण ज्ञान देत नसतो काहीतरी हातचा हा ठेवतच असतो म्हणून ही काही नियमांची माहितीच मिळत नाही.
विज्ञान काळात वावरणाऱ्या समाजाला इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे .गरज आहे ती नवीन अभ्यासकांनी आपणास येणाऱ्या अनुभवांचे निरीक्षण करून त्याचा फायदा समाजाला करून दयावा. जुन्या ग्रंथात दिलेले सगळेच नियम अचूक नसतात तरी तर्क बुद्दी वापरून व अनुभवा वरून भविष्य कथन केल्यास त्यास वजन प्राप्त होईल.
तरी प्रस्तुत लेख हा माझ्या अल्प अनुभवाने व निरीक्षणाने लिहिला आहे तरी वाचकांना विनंती की त्यांनी ही हंसा प्रमाणे निर-क्षीर विवेक बुद्धी वापरून ह्यावर विचार करावा.आपली कुठल्याही प्रकारे दिशाभूल करणे/ घाबरवणे हा प्रस्तुत लेखाचा मुळीच उद्देश नाही. जसे योग समाधी लागल्यानंतर येणारा अनाहत नादाचा प्रूफ कुठून आणणार तसेच याचे समजावे.
शेवटी ईश्वरी लीला ही अगाध आहे त्याचीच आराधना महत्वाची….!!!