प्रश्न वेगळा उत्तर मात्र वेगळं !!!!

Spread the love

आता हे काय बुवा नवीन ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेलच. तर थांबा..तुमची उत्सुकता जास्त न ताणता सांगून टाकतो काय घडलं काल ते….

 

तसं अशा घटना खूपच कमी घडत असतात. तर झालं असं की एका मुलाच्या  लग्नात खुप अडथळे येत होते म्हणून त्याच्या बहिणीने मला फोन केला की भावाचं लग्न कधी होईल ते आणी सारखं सारखं प्रोब्लेम का येत आहेत ते सांगाल का ?

 

मी: हो, *** फी आहे. तुम्ही ऑनलाइन पाठवून द्या मग सांगतो.

जातक: ठीक आहे सर, मी थोड्या वेळात पाठवते. आताच माहेरी आलीये.

 

मी सुद्धा बाहेर गेलेलो फोन आलेला त्या वेळेस म्हणून म्हटलं सावकाश पाठवलं तरी चालेल, आता बाहेर आहे.

 

रात्री पोहोचलो घरी आणि आजचे राहिलेले प्रश्न सोडवत होतो तर जातकांचा फोन आला. म्हणत होत्या की सॉरी सर मी फी नाही पाठवू शकले कारण पहिला गुगल पे नव्हतं ….दुपारी पहिल्यांदाच ते डाऊनलोड केलं तर माझं बँकेचे A T M कार्ड नाही मिळत आहे आणि त्याच्याशिवाय मी गुगल पे वापरू ही शकत नाही आहे आता.

 

कार्ड खूप शोधलं ..बहुतेक सासरीच राहिले असावे.

 

तुम्ही बघू शकता का कुठे असेल कार्ड ?

 

मी : हो बघेन की पण त्याची वेगळी फी लागेल हं😃

 

जातक: हो सर, चालेल.

 

[ मी त्यांना सांगितलं की मी गम्मत केली फी बद्दल पण सांगतो कुठे असेल कार्ड ते ]

 

☀ जातक कधीकधी किती खरं बोलतो ते समजत असतं म्हणून मग त्या वेळेस मीच  माझ्या नियमांचे कधीकधी उल्लंघन करत असतो.

 

लगेच कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्न कुंडली मांडून उत्तर दिलं की तुमचं कार्ड माहेरीच घरात सुरक्षित आहे. दक्षिण-उत्तरेचा कोपरा शोधा. काहीतरी इलेक्ट्रॉनिक गोष्ट असावी व सोबत काहीतरी लेडीज गोष्टी पण असतील तेथे मिळेल.

 

✍ वस्तूशी संबंधित कार्येश ग्रह व चंद्र सर्व माहीती  ज्योतिर्विदास पुरवत असतो प्रश्न कुंडली मध्ये. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

 

त्यावेळेचे ग्रहमान पाहता जातकाला कितीही शोधलं तरी कार्ड मिळणार नव्हते म्हणून म्हटलं उद्या शोधा मग मिळेल कार्ड.

 

जातक: ठीक आहे सर, आणि ह्या प्रश्नाची फी पण पाठवीन उद्या…

नेमका आज दिनांक २१ जानेवारीला रात्री त्यांचा मेसेज आला.

 

….. कार्ड सापडलं होतं तेही आजच टीव्हीवर लेडीज पर्स मध्ये.

 

सर्व स्वामींची कृपा ! 🙏


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page