“ जन्मलग्न अगर राशी कुंडलीत पंचमात अगर नवमात केतू, अष्टमात अगर द्वादशात गुरू अगर पीडित रवी अगर चंद्र किंवा कुंडलीत रवी केतू- राहूने पीडित गुरू इत्यादी लक्षणे पितृदोष दर्शवतात.”
🔰 प्रखर पितृदोष आहे हे कसे ओळखावे?
उत्तर: प्रखर पितृदोष असेल तर रोज दुपारी कावळे घरासमोर काव काव करुन जातात.
त्या कुटुंबात नित्य काही उलटेच घडत राहते.
शेजारच्या व नात्यागोत्यात संबंध अकारण दुरावतात.
जेष्ठ व्यक्तीस अकारण डोकेदुखी, भय, उदासी, हृदय काही वेळ अकारण धडकने, रात्री अचानक जाग येणे, मृत व्यक्ती स्वप्नात येणे, नाग दिसणे, गर्भपात होणे, पुत्र संतत्ती न होणे, मासिक पाळी मध्ये अनियमितपणा, चिडचिड होणे, आर्थिक अडचण येणे, भांडणामुळे जेवणाचे ताट भिरकावून देणे, इत्यादी गोष्टी होताना दिसून येतात असे दिंडोरी प्रणित महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे.
🔰 उपाय: वेगवेगळे श्राद्ध विधी, नारायण नाग बळी, इत्यादी.काहीच जमले नाहीतर अमावस्येला तीळ तर्पण तरी अवश्य करावे किंवा ते ही जमलं नाही तर पितृशांती साठी फक्त मनोभावे प्रार्थना करावी.
✅ आधिभौतिक म्हणजे आपल्याला पैसा, घर, मान जो हवा असतो तो सर्व व आपल्या कुळाचे रक्षक हे पितरच असतात त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय अध्यात्मिक प्रगती अथवा इष्ट देवतांच्या कृपाप्राप्ती मध्ये ही अडथळे येतात.
“म्हणून श्रीमंत घरात जन्माला येण्यापेक्षा ज्या घराला पितरांचे आशीर्वाद आहेत अशा घराण्यात जन्माला येणे म्हणजे भाग्याचे लक्षण मानले जाते.”
🔰 प्रश्न: पितरांचे फोटो घरात कुठे लावावेत की लावू नयेत ?
उत्तर: फोटो हे काही वर्षांपूर्वीच आलेत परंतु पितरांचे तैलचित्र आपण राजेरजवाडे ह्यांच्या महालात पाहू शकतो.
खरंतर मी काही ह्या विषयातील अधिकारी नाही की असेच करा म्हणून सांगायला पण जे वाचनात आले, जे अनुभवले त्याबरहुकूम सांगू शकतो की आपण आपल्या पितरांमुळेच ह्या पृथ्वीवर आहोत मग त्याना नाकारू कसे शकतो?
राहता राहिला प्रश्न फोटोचा तर वास्तूशास्त्र दृष्टीने दक्षिण दिशेला हे फोटो लावावेत प्रसंगी जागा नसेल तर पश्चिम दिशेस लावले तरी चालतील. (इथे फोटो ची पाठीमागची दिशा उल्लेखलेली आहे.)
🔰 आता दक्षिण दिशेसच का ?
कारण ही यम देवतेची दिशा आहे. ह्या दिशेस स्तंभन करण्याचे सामर्थ्य आहे.
जसे चांगल्या योनीतले पितर असतात तसे पिशाच्च योनीतले ही पितर असतात, जे त्रास देऊ शकतात. (ह्या बद्दल उदाहरण आपण श्री. व. दा. भटांच्या पुस्तकात निश्चित पाहू शकता).
पितर आपलेच असले तरी आपल्या कडून चुकूनही काही कमी जास्त झाल्यास लगेच कोप करतात व जातकाला त्रास देऊ शकतात म्हणून तो त्रास होऊ नये किंवा कमी व्हावा म्हणून किंवा त्यांच्या क्रोधावर नियंत्रण रहावे म्हणून ही दिशा सांगितली असावी असे वाटते.
✅ फोटो लावण्यासाठी एक पद्धत मला एका तज्ञाकडून समजली ती अशी की फोटो च्या मागे “श्री दत्त गुरूंचा फोटो लावावा किंवा श्री दत्त मन्त्र लिहावा” नंतरच फोटो घरात लावावा व रोज रात्री श्री दत्त गुरूंचा मंत्र १०८ वेळ बोलून पितरांना लवकर शांती-सदगती व मोक्ष मिळो ही प्रार्थना करावी. पितृस्तुती स्तोत्र ही वाचन करू शकता.
हा विषय खूप अथांग आहे. कल्याण मासिकात ह्यावर विपुल लेखन केलेले आहे त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा.
बाकी आपण आपल्या पितरांचे फोटो आपल्या मनाप्रमाणे घरात कुठेही लावलेत तरी हरकत नसावी कारण घर त्यांचेच आहे.😊
“ #आईवडीलांची जिवंत असताना काळजी घ्या फक्त – तेच महत्वाचे! 🙏”
…. नंतर कितीही आटापिटा करून फायदा नाही.