Navin Vyavsayik mhanun yash milel ka

Spread the love

नवीन व्यावसायिक म्हणून यश मिळेल का ?

एक नवीन व्यावसायिक एकदा त्याच्याच शहरातल्या एका हस्तरेषा तज्ञा कडे जातो व विचारतो की मी एक नवीन व्यवसाय सुरू करत आहे त्यात मला यश मिळेल का हे माझ्या हस्तरेषा पाहून कृपा सांगा.

 

तज्ञ पहिला त्याचा आर्थिक परिणाम दर्शविणारा उंचवटा पाहून म्हणतो, “तुला खूप पैसा मिळू शकतो”,

 

नंतर तज्ञ त्याची हृदय रेषा तपासून सांगतो की, “व्यवसायात तुला इतकी संकटे वारंवार येतील की तुझे हृदय अनेकवेळा विदीर्ण होईल,

 

नंतर  प्रसिद्धी देणारी रेषा तपासून सांगतो की तुला व्यवसायात अमाप प्रसिद्धी मिळेल,

 

सर्वात नंतर त्याचा हाताचा तळवा कडक आहे का  हे तपासून सांगतो की तुला तुझ्या बरोबरीच्या व्यवसायिकांपेक्षा चौपट मेहनत नेहमी करावी लागेल तरच वरील सगळे प्रत्यक्षात येईल. 😀

 

🔰 सारांश:

 

मित्रांनो, यश- अपयश हे आपल्या मेहनती वरच अवलंबून असते.

 

आपले ग्रहयोग कितीही भाग्यकारक असोत पण जर आपण मेहनतच केली नाहीत तर यश, पैसा, प्रसिद्धी कशी मिळणार? म्हणून जाती-धर्मा ला धरून कुणाविरुद्ध गटबाजी करून, राजकीय पक्षांच्या  फुकटच्या फौजदाऱ्या करून यश कधीच मिळणार नाही.

 

जरा आजूबाजूला बघा ह्या सर्व गोष्टी न करता ही विदेशी कंपन्या/व्यक्ती आपल्या व्यवसायात किती यशस्वी झाल्यात ते, अजूनही वेळ गेलेली नाही.

 

कुठल्याही व्यवसायासाठी आपल्याला सर्व जाती-धर्माची, गरीब- श्रीमंत, लहान-थोर अशी सर्वच मंडळींची गरज असते मग कशाला ह्या सर्वात अडकायचे ?

 

“स्वतः च करावा स्वतः चा विचार ! तरावया पार भवसिंधु !!”

 

…(डॉ. आंबेडकर)

 

✴ ज्योतीष शास्त्राप्रमाणे  तुमच्या कुंडलीतले भाग्यकारक योग असे ओळखावेत :

 

[इथे काही योगच देत आहे ह्याची वाचकांनी जाणीव ठेवावी]

 

१. भाग्य स्थानाचा व लाभ स्थानाचा स्वामी यांचा परिवर्तन योग होत असेल तर किंवा ह्या दोन्ही स्थानांचे स्वामींची युती होत असेल तर अशी व्यक्ती भाग्यवान असते.

 

२. आठ ही ग्रह फक्त चारच स्थानात असतील (जसे प्रत्येकी २ एका स्थानात) असेल तर अशी व्यक्ती भाग्यवान असते.

 

३. तीन ग्रह एकाच स्थानात असतील तर असेल तर अशी व्यक्ती भाग्यवान असते.

 

४. चार शुभ ग्रहांवर जर तीन पाप  ग्रहांची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती तितकीशी भाग्यवान नसते परंतु हाती पैसा भरपूर येत राहतो.

 

५. पाप ग्रह तृतीय, षष्ठ व लाभात असतील तर भाग्यवान असतात.

 

६. पंचमेश जर उच्चीचा गुरू असेल तर वडिलांपेक्षा त्यांच्या अपत्यांचे नशीब जोरदार असते.

 

धन्यवाद !

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page