माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याला समाजा शिवाय जगणे खरंच जड जाते हे लॉकडाऊन च्या काळात आपण पाहिलेच आहे.
समाज म्हणजे तरी कोण? शेजारी-व्यवहार करताना सबंध असणारी व्यक्ती, इतर लोक व सर्वात महत्वाचे म्हणजे आपले
‘मित्र-मैत्रिणी मंडळ’.
खूप वर्षा आधी एका दिवाळी अंकात एका गाजलेल्या तमाशातील लोक कलावंतिणीची मुलाखत वाचली होती.
तमाशात काय काय सहन करावे लागते ह्याचं जीवंत उदाहरण म्हणजे तो लेख होता पण कुठेतरी त्यानीं लिहिलेलं एक वाक्य मनाला चटका लावून गेलं, माहीत आहे कुठलं होतं ते?
“साथ करे बढोकी तो बढत-बढत जाय !
साथ करे गधेकी तो दो-दो लाथा खाय !!”
जीवनाचा किती अमूल्य संदेश मिळतो ह्यातून.
आपल्या सर्वांनाच काही चांगले मित्र नेहमीच मिळत नसतात.
काही जण मित्र आहोत असं बनाव रचून खरं तर आपलाच केसाने गळा कापत असतात, अडचणीत टाकत असतात, पण हे कळायला खूप वेळ जावा लागतो किंवा तो पर्यंत खूप उशीर झालेला ही असू शकतो.
पण कधीकधी चिंतेची बाब म्हणजे “व्यसनी मित्र मंडळामुळे” आपले अतोनात नुकसान होत असते म्हणून तुम्ही नक्की संगत कुणाची करताय हे ही तितकेच महत्वाचे!
मग ज्योतिष शास्त्रा मध्ये ह्यावर काही उपाय आहे का मित्र कसा आहे ते ओळखण्यासाठी?
ह्याचे उत्तर “होय” असे आहे.
कृष्णमूर्ती पद्धतीने आपण जर लाभ स्थानाचा उप नक्षत्र स्वामी पाहिलात तर आपल्याला ही ते कळून येईल की कुठल्या मित्रा पासून चार हात दूर रहायला हवे आणि कुठल्या मित्राबरोबर पार्टनरशिप मध्ये धंदा करायला हवा.
काही मित्र तुम्हाला मदत ही करतात बरं!
एखादा भाऊ नाही करणार पण मित्र नक्की करतो.
हे योग ही पाहता येतात जन्म पत्रिकेवरून/ प्रश्न कुंडली वरून (ज्यांची वेळ निश्चित माहीत नसेल त्यांच्यासाठी).
✍ लेखाचा शेवट एक छोटी पण उपयुक्त टीप देऊन करतो:
जर आपला लाभस्थानाचा उप नक्षत्र स्वामी व्यय स्थानाचा कार्येश असेल तर आपल्याला मित्रांपासून नुकसान होऊ शकते. व्यय स्थानाच्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सोबत मैत्री केल्यास असा अनुभव येऊ शकतो.
[व्यक्तीपरत्वे वेगवेगळे अनुभव येऊ ही शकतात.]