आपण खूपदा आपल्या घराजवळ अगदी मोक्याच्या ठिकाणी जरी धंदा केल्यास त्यात आपले नुकसानच होते तर कधी कधी जिथे धंदा होईल असे वाटत नाही अशा जागी धंदा तेजीत चालतो.
त्यास खूप सारी कारणे ही असू शकतात.
पण एक कारण वाचकांच्या फायद्यासाठी देत आहे ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.
तुम्ही जर आतापर्यंत नोकरी/धंदा केला असल्यास तो राहत्या ठिकाणापासून किंवा तुमच्या जन्मस्थानापासून कोणत्या दिशेस केला हे जर एका कागदावर लिहून काढलेत तर तुम्हाला समजून येईल की नक्की कुठल्या दिशेस व्यवसाय केल्यामुळे उत्पन्न वाढले आणि कोणत्या दिशेस उत्पन्न घटले.
सगळ्याच दिशा काही सर्वास लाभदायी ठरत नाहीत.
नोकरी करत असाल तरी हे समजून येईल की सर्वात जास्त पगाराची/ समाधान देणारी नोकरी आपल्याला कुठल्या दिशेस मिळाली होती आणि कुठली नोकरी कमी टिकली किंवा त्यात असमाधान/ कमी पगार मिळाला होता.
सध्याच्या अस्थिरतेच्या काळात वाचकांना चांगले उत्पन्न मिळावे म्हणून काही ज्योतिष शास्त्रीय योग देत आहे. त्याचा वापर करून आपण चांगले उत्पन्न मिळवाल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
✴ ग्रह 👉 दिशा
रवी 👉 पूर्व
चन्द्र 👉 वायव्य
मंगळ 👉 दक्षिण
बुध 👉 उत्तर
गुरू 👉 ईशान्य
शुक्र 👉 आग्नेय
शनी 👉 पश्चिम
राहू 👉 नैऋत्य
केतू 👉 नैऋत्य
🎲 भाव 👉 दिशा
१ मेष 👉 पूर्व
२ वृषभ 👉 दक्षिण
३ मिथुन 👉 पश्चिम
४ कर्क 👉 उत्तर
५ सिह 👉 पूर्व
६ कन्या 👉 दक्षिण
७ तूळ 👉 पश्चिम
८ वृश्चिक 👉 उत्तर
९ धनु 👉 पूर्व
१० मकर 👉 दक्षिण
११ कुंभ 👉 पश्चिम
१२ मिन 👉 उत्तर
“वाचकानी अभ्यासावे की जन्म कुंडलीत धनेश (द्वितीय स्थान) कुठल्या राशीत बसला आहे त्या राशीच्या दिशेस आपल्याला विशेष अर्थलाभ होईल/ भाग्योदय होईल.”
शक्यतो त्या दिशेस व्यवसाय केल्यास उत्तम धनार्जन होऊ शकेल.
✍”भाग्योदय नक्की कधी होईल?”
हे ही आपल्या येणाऱ्या दशेवरून काढता येईल पण त्यासाठी पूर्ण पत्रीका अभ्यासावी लागते.
[सूचना: प्रत्येकाच्या जन्म पत्रिकेनुसार वेगवेगळे अनुभव येऊ शकतात.]
आपल्याला कुठली दिशा भाग्यकारक आहे हे कंमेंट् मध्ये लिहू शकता.
🌀”काम कुठलेही असो त्यास कमी लेखू नका उलट जे करता त्यात जीव ओतून करा, सचोटीने करा मग यश तुमचेच असेल.”