“कोणतेही गोष्ट कमी करण्याचा गुण”

Spread the love

आपल्या पत्रिकेत जन्मस्थ ग्रह जर बलवान  असतील तर खाली दिलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात “मुबलक” मिळतील पण जर तेच ग्रह जर दुर्बल असतील तर त्यामध्ये न्यूनता आलेली दिसून येईल असे संशोधन कल्याणवर्मांनी करून ठेवलेले आहे.

 

वाचकांच्या माहितीसाठी ते खाली देत आहे:

 

🔰 रवी : आत्मा बलवान होऊन काम करण्याची ऊर्जा वाढते, केलेल्या कार्यात यश मिळते. असे जातक शक्यतो वारंवार आजारी पडत नाहीत पण दुर्बल असता कुठलेही काम मनासारखे होत नाही, आजारपण मागे लागलेले दिसून येईल.

 

🔰 चंद्र: चित्त स्ट्रॉंग बनून बुद्धी, कल्पनाशक्ती  वाढते. म्हणूनच की काय कवी आणि चंद्राचे घनिष्ठ नातं असतं.😃 बिझिनेस च्या स्ट्रॅटेजी चंद्र ज्यांचा बलवान आहे त्यांच्याकडून बनवून घ्याव्यात.

 

🔰 मंगळ: शारीरिक प्रकृती, ताकद मंगळ बलवान असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते पण ज्यांचा मंगळ दुर्बल असेल त्यांची शरीरयष्टी कृश असल्याची दिसून येईल.

 

🔰 बुध: बोलण्याची कला, हातोटी, चातुर्य हे बुधा चे डिपार्टमेंट. बलवान बुध असेल तर ह्यांचे बोलणे नेहमी कर्णमधुर असेच असते. नाहीतर मध्ये मध्ये तुटक तुटक बोलणे, काहीही बेजबाबदार बोलणे, बोलण्यात आत्मविश्वास नसणे ह्या गोष्टी दिसून येतात.

 

🔰 गुरू: शहाणपण देगा देवा … असं म्हणतात ते बहुतेक गुरू ग्रहावरून आलेले असावे. जातकास उपजत असलेले शहाणपण, सुज्ञपणा गुरुग्रहामुळे मिळतो. तोच जर दुर्बल असेल तर बुद्धीहीनता, असमंजसपणा दिसून येईल. शिक्षणात अडथळे, कामात व्यवहारी नसल्यामुळे अपयश अशा गोष्टी दिसून येतील.

 

🔰 शुक्र: एखाद्या गोष्टीची passion असणे, वैवाहिक सुख ह्या गोष्टी शुक्र ग्रहामुळे मिळतात. शुक्र बलवान असेल तर जोडपी खुश असतात पण तोच जर दुर्बल असल्यास भांडण, मतभेद, बाहेरख्यालीपणा, व्यवसायात रस नसणे ह्या गोष्टी दिसून येतात.

 

🔰 राहू: ज्ञान कारक मानला जातो. बलवान असेल तर धार्मिक ज्ञान चांगले असते पण जर दुर्बल असेल तर मात्र अधार्मिक कार्यात रस दिसून येतो.

 

🔰 केतू: मोक्ष कारक असून अध्यात्मात लवकर प्रगती होते.

 

🔰 शनि: दुःख (मग ते कोणतेही असो)  व आजार ह्यांचे डिपार्टमेंट शनी देवांकडे दिलेले आहे.

 

बाकी सगळ्या ग्रहांची फळं आपण वरती बघितली, त्यानुसार जर ते ग्रह बलवान असतील तर त्यांच्या कडे असणाऱ्या गोष्टींमध्यें वाढ करतात आणि दुर्बल असतील तर घट करतात पण फक्त शनी ग्रहच त्यामध्ये अपवाद आहेत जे पत्रिकेत बलवान जरी असतील तरी जातकाच्या दुःखात वाढ न करता उलट ते “कमीच” करत असतात.

 

#इथे शनी देवांचा न्यूनता आणण्याचा गुण वाईट मानावा की चांगला हे वाचकांनीच कमेंट्स मध्ये लिहलेले बरे !

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page