जातक: काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सांगितलं की त्याला कसे शनी ची साडेसाती ने फटके दिले होते, कशी वाताहत झाली होती आणि त्याने अजून एक सांगितलं की साडेसातीच्या काळात त्याच्या वडिलांचा पण मृत्यू झाला.
“बाकी सगळे मला पटले कारण सध्या मलाही साडेसाती चालू आहे पण एका भीतीने मला ग्रासले आहे की ह्या माझ्या साडेसातीच्या काळात काय माझेही वडील जातील? मी खूप अपसेट झालोय. खरंच असं होईल का सर?”
उत्तर: शनी ग्रह मृत्यूदायक व पीडाकारक म्हणून जरी प्रसिध्द असला तरी एकाद्या जातकाला जर साडेसाती चालू असेल तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन होतंच असे विधान करणे म्हणजे चक्क अंधश्रद्धा आहे.
शनिदेव सगळीं त्रासदायकच फळं देतात असे नाही तर साडेसातीच्या काळात खूप सारी चांगली फळं ही मिळतात….
🔰 जसे उत्तम मित्र मिळणे (कारण साडेसाती मध्ये कोण आपलं कोण परके जे सहज कळते);
🔰 जागा/ घरदार होतं;
🔰 बँक बॅलन्स वाढतो ( शनी ग्रह खर्च करण्यास सहसा देत नाहीत, म्हणजे कंजूष पणा वाढून पैश्या ची बचत होते), इत्यादी.
✍ घरातल्या कुणाही व्यक्तीच्या साडेसातीमुळे नाही तर प्रत्येक माणसाच्या विधिलिखिताप्रमाणेच जो तो अनंतात विलीन होत असतो.
ज्या दिवस आपण जन्म घेतो त्याच वेळेस आपल्या मृत्यूची तारीख ही ठरलेली असते.
जर साडेसाती मुळे कुठल्याही नातेवाईकाचा मृत्यू होत असता तर जगाची लोक संख्या खूपच कमी झाली असती व सरकारला “हम दो – हमारे दो!” चा नारा द्यावा लागला नसता. पण असे होताना दिसून येत नाही.
✍ ज्योतिष शास्त्र हे इतर शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे त्यावर श्रद्धा ठेवली तर खूप चांगले परिणाम दिसून येतात पण अंधश्रद्धाळू बनून उगाच चिंता करत बसू नये.
“जन्मल्या पासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच जीवन! “ मग ते आनंदात घालवायचे की चिंता करत हे आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
अगोदरच्या माझ्या सर्व लेखांना आपला भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलेत, सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आजचा लेख आपल्याला कसा वाटला ते ही कंमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा.