कावळा Crow आपला नेहमी दिसणारा पक्षी. लहान असल्या पासून चिऊ – काऊ च्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालेलो असतो. पण कावळ्यांच्या घरटे बांधण्याचा व पाऊस पडण्याचा काही संबंध असेल ?
आपल्या शास्त्रात कावळा झाडावर कुठे घरटे बांधतो त्यावर पाऊस कसा पडेल हे वर्णिले आहे.
जर झाडाच्या पूर्व बाजूस घरटे बांधले असेल तर उत्तम पाऊस पडून समाजास लाभ देणारे वर्ष ठरते.
झाडाच्या आग्नेय कोणते घरटे बांधलेले असल्यास ढग कमी पाऊस असणारे असतात व त्या वर्षी लोकांस संपन्नता कमी मिळते.
झाडाच्या दक्षिण भागात घरटे बांधल्यास दोन महिने पाऊस पडतो त्या नंतर फक्त तुषार रुपी वर्षा होते.
नैऋत्य दिशेस घरटे बांधल्यास पहिला तर पाऊस पडत नाही परंतु नंतर मुसळधार पाऊस पडतो.
पश्चिम दिशेस घरटे बांधल्यास अतिवृष्टी होते. वायव्य दिशेस घरटे बांधल्यास वारा – पाऊस होतो. उत्तरेस घरटे बांधल्यास अतिवृष्टी होते. ईशान्य दिशेस घरटे बांधल्यास मध्यम वृष्टी.
झाडाच्या वरील बाजूस घरटे बांधल्यास चांगला पाऊस होतो.
कावळ्याने जर जमिनीवर अथवा कोणत्याही घरात अथवा झाडाच्या डोलित घरटे बांधल्यास त्या वर्षी दुष्काळ होतो त्याच बरोबर राजकिय युद्ध होण्याची संभावना असते.
नदीच्या किनारी जमिनीवर घरटे बांधल्यास सुका दुष्काळ पडतो.
अजून काही टिप्स कावळ्यांच्या घरटे बांधण्यावरून देता येतात. आपल्याला लेख आवडला असल्यास नक्की कमेंट्स करा म्हणजे पुढील लेखात नक्की देईन.
©
ज्यो. कौशिक घरत
कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धती अभ्यासक
मो. 9833737919
लेखकाच्या संपूर्ण माहितीसह लेख शेअर करू शकता.
Khup chan lekh