आपल्या सर्वांना माहीत असेलच की जन्म कुंडलीतील षष्ठ स्थान हे आजारपण दर्शविते.
आजार मग तो कुठलाही असो बहुतेक करून आपल्या आहाराविषयी च्या चुकीच्या सवयीमुळे होतो.
“शांत झोप- पोषक आहार- चांगले विचार” हेच सुखी जीवनाची त्रिसूत्री आहे. ज्यांची ही त्रिसूत्री बिघडली त्यांच्या मागे आजार लागतोच हे वैश्विक सत्य आहे.
🔰 जातकाच्या आहाराविषयक कोणत्या सवयी असू शकतात हे आपल्याला त्याच्या षष्ठ स्थानात कोणते ग्रह आहेत हे पाहून सांगता येते:
- बुध: ह्या जातकांचा लहान मुलांसारखा हट्टी स्वभाव जेवणाबाबत असतो. ह्यांची खाद्यपदार्थ ची निवड ही त्यांच्या मनावर अवलंबून असते. आज पिझ्झा ची जाहिरात बघितली तर पिझ्झाच खाणार मग कितीही पोषक अन्न त्याना द्या त्या कडे बघणारही नाहीत अशाप्रकारचा.
- शनी: ह्या बिचाऱ्या जातकांची तशी कटकट नसते जेवणाबाबत परंतु त्याना वेळेवर सकस अन्न न मिळणे, कुपोषण ह्या समस्येला तोंड द्यावे लागते.
- मंगळ : हे लोक अति मौजमजा करण्यासाठीच जणू काय खात-पित असतात. किती, काय व केव्हा खावे ह्याचे याना काही सोयरसुतक नसते.
- गुरू: तसे ह्यांचा आहार ठीकठाक असतो परंतु दुसऱ्यानं आग्रह केलाच तर ही मंडळी मात्र ताव मारतात अन आजारपण ओढवून घेतात.
- चंद्र: आहारात लहरीपणा खूप असते. काय खातील त्याचा नेम नाही. सजवलेलं, आकर्षीत करणारे खाद्यपदार्थ ह्यांना नेहमी आवडतात. त्यात जर चंद्र मंगळाशी कनेक्टेड असून जलराशीत असेल तर दारूच्या आहारी सुद्धा जाऊ शकतात.
- शुक्र: उत्तमोत्तम पदार्थ खाणे ही ह्यांची आवड असते. प्रसंगी एकच प्याला ला न जुमानता बॉटल ही घशात गटागट रीती केली जाते आणि आजार ओढवून घेतात.