पूर्वीच्या काळी बरेचसे शेतकरी लागवड करण्याअगोदर ज्योतिष शास्त्राची मदत घ्यायचे.
जातकाच्या पर्सनल आयुष्यात जशी घटनांची अनिश्चितता असते तसेच शेती मध्ये पण असते. जसे की अवेळी येणारा पाऊस, गारा पडणे, पूर, दुष्काळ, इत्यादी. एव्हढेच नाही तर पीक जरी जोमाने वाढत असेल तर ऐनवेळी त्यात जंगली प्राण्यांनी नासधूस करणे, आग/वणवा लागून नुकसान होणे ह्या आपत्तीस ही तोंड द्यावे लागत असे.
तसे म्हणायला गेलं तर शेतकरी राजा असतो परंतु वरील अनिश्चितपणामुळे तो राजा किती दिवस राहील ह्याची काहीच शाश्वती नसते.
“जगाला पोसणारा राजा मधले दलाल व आस्मानी संकटात जर अडकला तर आपल्या कुंटुबाला देखील दोन वेळेचे जेवण कधी कधी देऊ शकत नाही.”
शेतीविषयक मुहूर्त:
✅ लागवड करण्यासाठी शेतकऱ्याने रेवती, हस्त, मघा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, मृगशीर्ष, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पुष्य व चित्रा नक्षत्र निवडली पाहिजेत.
✅ मंगळवार, बुधवार व शनिवार वर्ज्य करावा.
✅ मीन, वृषभ, मिथुन, व कन्या लग्न निवडावे.
✅ प्रतिपदा, पौर्णिमा, कृष्णपक्ष -अष्टमी, नवमी व चतुर्दशी वर्ज्य करावी.