आपल्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी गंगा नदी साफ ठेवण्यासाठी जो प्रोजेक्ट आणला त्याला कारण जसे वैज्ञानिक आहे त्याच बरोबर धार्मिक ही आहे.
गंगेच्या पाण्यातच अशी जादू आहे की बरेचसे बॅक्टेरिया त्यात आपोआप नष्ट होऊन रोगराई पसरत नाही हे कित्येक वेळा देश-विदेशातील वैज्ञानिकांनीं सिद्ध ही केलंय. मग हे तत्वज्ञान आपल्या ऋषी-मुनींनी समाजाला कसे पटवून दिले असेल तर ते तीर्थस्नानाच्या पवित्र स्नानाच्या माध्यमातून. म्हणून गेली कित्येक शेकडो वर्षे भक्तगण गंगेच्या पाण्यात डुबकी मारल्यावर आपण पापमुक्त होतो असे समजतात. [इथे पाप म्हणजे आजार असे घेतले तर ते समजायला जास्त सोपे जाईल.]
आपल्या कित्येक जणांची श्रद्धा असते की गंगा, वज्रेश्वरी, नरसोबाची वाडी इत्यादी तीर्थक्षेत्री जर आपल्याला तीर्थस्नानाचा योग आला तर पदरी पुण्य जमा होते आणि ते खरे ही आहेच.
उदा. वज्रेश्वरी येथील गंधकयुक्त उष्ण प्रवाहात चामडीचे आजार बरे होतात.
पण तुम्हाला माहीत नसेल की तीर्थस्थानाचा योग प्रत्येक मनुष्याला येतोच असे ही नाही. त्यासाठी नशीब असावे लागते. जसे मुस्लिम लोक सुद्धा मानतात की हज यात्रा करण्यासाठी पैसा असून उपयोग नसतो तर नशीब असावे लागते तद्वतच आपल्या हिंदू धर्मात ही तीर्थक्षेत्र दर्शन व तीर्थस्थान करण्यासाठी #नशीब असावेच लागते.
तीर्थक्षेत्र व तीर्थस्नानाचे महत्व आपल्याला “श्री गुरू चरित्रात” पारायण करताना निश्चितपणे सापडेल ह्यात शंका नाही.
नशीब आले की ज्योतिष शास्त्र अलबत येणारच….
🕉 मग तुम्ही आता स्वतः च स्वतः च्या कुंडलीत पडताळून पाहू शकता की तीर्थस्नानाचा योग तुमच्या कुंडलीत आहे की नाही ते खाली दिलेल्या ज्योतिष शास्त्रीय योगांवरून :
- धर्मकारक गुरू चे जर दशम स्थानाशी संबंध येत असेल
- पंचम, सप्तम, नवम, दशम या स्थानांचे स्वामी व गुरू हे सर्व जर जलराशीत असतील तर गुरू ग्रहाच्या दशेत गंगास्नानाचा लाभ मिळू शकतो.
- जर गुरू व शनी ग्रह कुंभ राशीत नवम स्थानात असेल किंवा रवी-शुक्र- गुरू मकर राशीत दशमात असेल तर अशा जातकाचे गंगेत डुबकी मारण्याचे भाग्यच भाग्य. असे योग असलेल्या जातकाला वारंवार गंगास्नानाचा आनंद सहज मिळतो.
मग लिहा कमेंट्स मध्ये तुमच्या पत्रिकेत गंगा स्नानाचे हे योग आहेत का ?