गुरुपौर्णिमा – २०२४

Spread the love

येत्या २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ज्यांनी जगायला शिकवलं – लढायला शिकवलं त्या माझ्या सर्व गुरूंना, ज्योतिषशास्त्रातले माझे प्रथम गुरू श्री. विजय हजारी यांना, उपासनेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना, मित्र-जातक- समव्यवसायिक ह्यानी ही काही नवीन गोष्टी शिकवल्या त्यामुळे ह्याही सर्व गुरूंना व सर्वात शेवटी माझे इष्ट गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, गगनगिरी महाराज व श्री शिवकृपानन्द स्वामी ह्यांना मनःपूर्वक नमस्कार करून आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा लेख सुरू करतो.🙏🌺

 

आता पावसामुळे असो किंवा अन्य कारणामुळे असो आपल्या सर्वांना आपल्या गुरुस्थानी जाणे शक्य होईल की नाही त्याची खंत आपल्या मनात जर सळसळत असल्यास त्वरित ती काढून टाका.

 

कुणी म्हणेल असं का म्हणता?

 

कारणे अनेक आहेत त्यापैकी काही इथे देण्याचा प्रयत्न करतो. मुळात सर्व गुरू हे वेगवेगळे नसुन ज्या प्रमाणे ईश्वर एकच आहे तसेच सर्व गुरू ही खरंतर एकच आहेत, त्यात द्वैत भाव नाही. सर्व गुरू ही त्याच एका गुरुशक्तींची वेगवेगळी रूपे आहेत.

 

🌀गुरुशक्तीं म्हणजे दुसरे काही वेगळे नसून ह्या सृष्टीत संचारीत असणारे “चैतन्य” च आहे. ज्या चैत्यन्यामुळे आपण हवा, पाणी, उष्णता, श्वास घेत आहोत तेच हे चैतन्य!

 

श्री शिवकृपानन्द स्वामींनी पण त्यांच्या प्रवचनात सांगितलच आहे की तुम्ही कितीही शेकडो किलोमीटरवर असा, तुम्हाला काही कारणामुळे गुरुभेट जरी आजच्या दिवस झाली नसेल तरी हरकत नाही गुरुशक्तीच स्वतः हुन तुम्हाला भेटावयास येत असतात फक्त त्या तुम्हाला अनुभवता आल्या पाहिजेत.

 

गुरुशक्तीं श्रेष्ठ शिष्या कडे स्वतः सूक्ष्म रूपाने भेटण्यास येतच असतात त्यामुळे तुम्हाला जरी आज येता आले नाही तरी काळजी करू नका, गुरुशक्तीं तुमच्या जवळच आहे. त्यांचे तुमच्यावर बरोबर लक्ष आहे. अगदी आपल्या प्रथम गुरू आई सारखे. मग कसली खंत? उलट मिळालेल्या संधीच सोनं करा, तुमची उपासना वाढवून, परोपकार करून आवडता शिष्य बनायचा प्रयत्न करा.

 

✍ एक अनुभव वाचकांसाठी शेअर करत आहे.

 

आपल्या जवळ गुरूशक्ती आल्या आहेत की नाही हे कसे ओळखायचे ?

 

जर आपण ध्यान, मन्त्र जप किंवा स्तोत्र/पारायण करत असाल तर ज्या वेळी गुरुशक्तीं चे आगमन होते त्यावेळी अचानक आपल्या मेंदू च्या स्थानी म्हणजे सहस्त्रार चक्रावर स्पंदने जाणवायला सुरुवात होते किंवा आपल्या उजव्या हातावर (जर आपण हाताचा तळभाग आकाशाकडे ठेऊन उपासना करत असल्यास) हाताच्या बोटांकडून थंडगार स्पंदने जाणवायला सुरुवात होते व ती हळूहळू वाढायला लागतात त्यावेळी श्री गुरुशक्तीं चे आगमन झाले आहे हे आपण ओळखू शकता.

 

जर आपल्यात निगेटिव्हीटी जास्त असल्यास पहिला डाव्या हातातून गरम स्पंदने बाहेर जाताना जाणवतील व त्यानंतर थंडगार स्पंदने उजव्या हातातून शरीरात प्रवेश करताना जाणवतील.

आपल्या सर्वांच्या शरीरात प्राणरूपी जे चैतन्य आहे ते सुद्धा दुसरे तिसरे काही नसून ती गुरुशक्तीच आहे.

 

आपल्यात असणाऱ्या गुरुशक्तीस ही साष्टांग नमस्कार करून आपणा सर्वांना येणार्‍या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page