खूप जातकांना हा प्रश्न असतोच पण त्याचे उत्तर बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतात. सर्वात पहिले म्हणजे जातकास दशे च्या त्रासामुळे धंदा/ नोकरी नीट चालत नाही. जॉब सुद्धा काही कारणाने सोडून दिला जातो किंवा जॉब वरून अचानक कमी केलेलं असू शकते. सगळेच दिवस दिवाळी नसते ह्या म्हणी प्रमाणे धंदा म्हटला की उतार-चढाव येणारच.
जेव्हा निश्चित मिळकत दर महिन्याला घरात येत नाही आणि खर्च मिळकती पेक्षा जास्त होतो तेव्हा जातकांचे प्रश्न येत असतात की पैसे काही केल्या का टिकत नाहीत.
न टिकण्यासाठी वेगवेगळी अध्यात्मिक कारणं ही असू शकतात जसे की एखाद्याचा मोबदला आपण दिला नाही/ जमीन-जंगम मालमत्ता खोटेपणाने लुबाडून घेतली, गरजवंतास पैसे असूनही मदत केली नसल्यास अथवा अपात्र व्यक्तीस दान केले आणि त्या व्यक्तीने त्याचा वापर नशा करण्यासाठी करून कुटूंबाचे हाल केलेले असतील तर त्यांची हाय ही नशा करायला पैसे दिलेल्या व्यक्तीस लागलेली असू शकते.
साधारणपणे दशा स्वामींच्या कार्येशत्वा ला जुळणारे व्यवसाय केल्यास त्याच्यात यश येते. काही जातकानी धंदा/ नोकरीच जर चुकीची निवडलेली असेल अथवा चुकीच्या पद्धतीने करत असेल तर यश कसे मिळणार.
धार्मिक ग्रंथात खूप सारे उपाय मिळतात लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी किंबहुना जातक ही ते करून पाहतात पण व्यवसायाची निवडच चुकली असेल तर खरच त्याचा फायदा होतो?…
टीप: ज्या दिवशी पैसे घरात येतात तेव्हा लगेच त्याच दिवस खर्च करू नयेत, दुसऱ्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा भाग वेगळा करून सयंमाने खर्च केल्यास लक्ष्मी टिकण्यासाठी मदत होते. अडचणीत असताना काही गोष्टीचा त्याग ही जरूर करावा कारण चंचलता हा लक्ष्मीमातेचा गुणच!