साधारण २ दिवस अगोदर फेसबुक वर कुणाची तरी पोस्ट बघितली (पोस्ट खाली जोडली आहे) की “ह्या वयात कितीही बुध्दी मागितली तर गणपती ढेरीच देणार”
ढेरी म्हणजे “सुटलेले पोट.”
वरील पोस्ट करणाऱ्याने ती जोक म्हणूनही केली असावी कारण विशिष्ट वया नंतर पोट सुटतेच परंतु माझ्या मनात मात्र वेगळाच विचार तरळून गेला की “श्री गणेशा चे पोट काय बरे सुचवत असावे ?”
लंबोदर तर एक सर्वश्रुत नाव आहेच. परंतु देव बुध्दी देणारा तर ह्या मोठ्या पोटावरून काय सुचवत असणार ?
माझ्या मते बाप्पा सांगत असेल की जी बुद्धि मी तुला दिली आहे त्याचा विचार करून खालील गोष्टी टाळल्यास तर तुझे व समस्त जगाचे कल्याण होईल !
कोणत्या गोष्टी टाळाव्यात :
१. भुकेपेक्षा अती खाऊ नको नाहीतर अजीर्ण व इतर आजार होतील कारण पोटच बहुतांश शारीरिक आजारांचे कारण आहे.
२. स्वतः च्या परिवारास पुरेल इतकाच धन – संपत्ती संचय कर नाहीतर तुझी पुढची पिढी आळशी होईल, पैसा चुकीच्या मार्गात अचानक खर्च होऊन त्याचे पाप तुलाच लागेल, अधिक प्रमाणात धन संचय केल्याने तुझे धन चोरीला जाण्याचे – तुला तुझ्या स्वतः च्या जीवाचे भय निर्माण होईल.
धन संचय न केल्याने सर्व तळागाळातील व्यक्ती दोन वेळेचे अन्न व निवारा कमी कष्टात मिळवू शकतील. त्यांना मिळालेल्या आनंदाने तुला त्यांचे व माझे शुभाशीर्वादच मिळतील.
अजून श्री गणेशास काय सुचवावेसे वाटत असेल असे आपणास वाटते ? (आपल्या कल्पना कमेंट्स मध्ये जरूर लिहा.)
ज्यो. कौशिक घरत
कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धतीचे अभ्यासक
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व ऑनलाईन ज्योतिष विद्यालय
मो. 9833737919