“धर्मग्रंथ ही कसे व्यवसाय करण्यासाठी उपयोगी “

Spread the love

टीव्हीवर रामायण पाहताना एक खूप सुंदर संवाद बघितला.

 

धर्मग्रंथ ही कसे व्यवसाय करण्यासाठी उपयोगी सिद्ध होऊ शकतात ह्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून आपण हा लेख पाहू शकता.

 

प्रसंग असा होता की महाबलवान रावण श्री रामाबरोबर युद्ध करण्यास रणांगणात आलेला असतो. त्यावेळी रावणाचा भाऊ विभीषण एकसारखा  रामाच्या पायाकडे व रावणाच्या पायाकडे पाहत असतो.

 

हे पाहून श्री राम त्याला विचारतात की तू असं का बघत आहेस, तुझ्या मनात नक्की काय द्वंद्व चालू आहे?

 

तेव्हा विभीषण त्याची मनोव्यथा श्री रामांपुढे मांडतो की रावण रणांगणात सुसज्ज रथात बसून आपल्याशी युद्ध करावयास आलेला आहे आणि आपण तर अनवाणी पायांनी जमिनीवरच उभे राहून युद्ध करत आहात, तर कसे जिंकणार?

 

ह्यावर श्री राम म्हणतात की युद्ध करण्यासाठी धातूचा  रथ आवश्यक नसून वीर योध्यास फक्त धाडस हवे असते, सत्यनिष्ठता हवी असते, बलवान शरीर, धर्माचरण हवे असते.

 

ह्या सगळ्यांच्या बळावर वीर कुठलेही युद्ध जिंकू शकतो.

 

✍ थोडासा वेगळा विचार केल्यास हाच सल्ला आपल्याला आपल्या व्यवसायात ही उपयोगी पडू शकतो.

तो कसा?

 

काही जातक कुठलाही धंदा सुरू करताना प्रथम हा विचार करतात की आपण ह्या क्षेत्रात धंद्यास सुरुवात तर करत आहोत पण ह्या क्षेत्रात अगोदरच खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आपले हातपाय घट्ट रोवून उभ्या आहेत, त्यांच्याकडे मुबलक स्थावर व जंगम मालमत्ता आहेत, राजकीय पाठबळ आहे, ७०% – ९०%  मार्केट शेअर आहे आणी ह्याउलट आपल्याकडे वर्किंग कॅपिटल च नाहीये त्यासाठी सुद्धा आपण कर्ज घेतलंय, स्थावर मालमत्ता म्हणजे फक्त आपले वडिलोपार्जित घरच, मालाची ने-आण करण्यासाठी फक्त आपले दोन पाय सोबत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा.

 

मग कसा आपला धंदा टिकेल?🤔

 

हया परिस्थितीत आपण श्री रामांनी दिलेला उपदेश उपयोगात आणायला हवा.

 

🌀ज्योतिषशास्त्रानुसार महादशा-अंतर्दशेसोबत आपल्या जन्म  कुंडलित जर मंगळ, गुरू शुभ योगात असतील तर आपल्याला धंद्यात यश हमखास मिळतेच. मंगळ तृतीयात असणारा व्यक्ती लीलया कुठल्याही कठीण प्रसंगाला धीराने तोंड देऊ शकतो. धाडस दाखवून पुढे जाऊ शकतो. 🌀

 

उदाहरण द्यायचे झाले तर नागपूरचे सुप्रसिद्ध हल्दीराम घ्या नाहीतर बालाजी वेफर्स वाले घ्या नाहीतर पुण्याचे चितळे श्रीखंड वाले घ्या सर्वांनी आपापल्या जिद्दीने धंदा नावारूपास आणला.

 

✍ गरज आहे ती धाडस करण्याची.

 

दुसऱ्याकडे काय आहे आणी आपल्याकडे काय नाही ह्याची तुलना करत न बसता फक्त  काम करत रहा.

 

“एक ना एक दिन आपका भी टाइम आयेगा! 😊”

 

विठूराया आपल्याला ही  आपल्या व्यवसायात घवघवीत यश देवो हीच प्रार्थना !🙏🌺


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page