छोटासा संसार

Spread the love

आपल्याला खूप वेळ ऐकायला मिळतं की वैवाहिक सौख्य खराब म्हणजे नक्की काय?

 

जर मग असं असेल तर मग फक्त डीव्होर्सच होतो ना…त्या नंतर दुसरे लग्न करता येईल मग काय त्यात, असे म्हणून वेळ मारून नेली जाते.

 

☀ मुलगी पसंत पडली रे पडली की जुजबी पत्रिका जुळवून लग्न उरकून घेतले जाते. मग पत्रिका बघणाऱ्याला त्यात जास्त गती असो की नसो “हो” फक्त त्याना ऐकायचं असतं.

 

आता हे पैसे वाचवण्यासाठी करतात की नकार टाळण्यासाठी हे ज्याचे त्यानाच माहिती.🤔

 

ही पत्रिका पहा. जातकाची  लग्नाची तारीख मी काढून दिल्याप्रमाणे लग्न ही झाले होते परंतु मुलीची पत्रिका काही मला दाखवली गेली नव्हती. तशी वैवाहिक सौख्याबाबत कल्पना अगोदरच दिली होती जातकाला पण त्याच्या  वडिलांनी ओळखीच्या एका ज्योतिषांना गुणमेलन करण्यासाठी दिले होते मग सरळ लग्नाची पत्रिकाच माझ्या हातात पडली.

 

आता एकदा काय शुभ कार्य ठरलं तर त्यानंतर जास्त बोलू नये म्हणून ते आनंदी तर सगळे आनंदी.🎁🙄😑

 

सप्तमेश गुरू मकरेत नीच राशीत पंचमात. गुरू महादशेत लग्न झाले. विशिष्ट ग्रहयोगा मुळे  मुलाचे प्रमोशन ही कामावर झाले होते + नंतर नवीन घर ही घेतले म्हणजे लग्नानंतर जातकाची प्रगतीच झाली.

 

✅ कशी ते बघा:

 

चतुर्थ व लाभ कस्प चा उप नक्षत्र स्वामी बघा गुरू आहे, गुरू द्वितीयात असणाऱ्या मंगळाच्या नक्षत्रात आहे त्यामुळे घर घेणार हे नक्की होते. त्यात गुरू सप्तमेश म्हणजे गुरू जरी नीच राशीत असला तरी लग्नानंतर प्रगती करणारच. अगदी त्याच प्रमाणे एक वर्षात घर झाले देखील पण….

 

नवीन घराची वास्तू शांती ची पूजा झाली. सगळे खुश होती पण काही कारणाने हे नवीन जोडपे जुन्याच घरात काही दिवस राहायला गेले होते आणि तिथेच घात झाला. नवरा कामावर गेलेला असताना जातकाच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती.

 

ते भांडले होते का? काही वितुष्ट होते का दोघांमध्ये? ….तर ह्याचे उत्तर नाही असेच होते. जातक खूप सरळमार्गी असल्याने त्याने त्रास दिला असण्याची सुतराम शक्यता नव्हती. परन्तु आत्महत्या का केली हा प्रश्न कायम अनुत्तीर्णच राहिला.

 

सप्तम भावात ह्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. एका जन्मकुंडली वरून देखील आपल्याला इतर नाती बघता येतात हे आपल्याला माहीत असेलच.

 

सप्तमेश हे वैवाहिक जोडीदाराचे प्रथम स्थान समजून बघा म्हणजे क्लिअर होईल.

 

लग्नेश गुरू  मृत्यू स्थानातल्या मंगळाच्या नक्षत्रात आहे म्हणजे जोडीदार आत्महत्या करण्याची मानसिकता राखून आहे हे समजून जोडीदाराची पत्रिका नीट अभ्यासायला हवी होती.

 

वैवाहिक सौख्याबाबत खूप साऱ्या हिंट्स ह्या पत्रिकेवरून देता येतील परंतु लेखनसीमा….वाचकांना आवडल्यास पुढे ही पत्रिका उलगडून दाखवेनही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page