Shri Swami Samarth Online Jyotish Vidyalay logo

प्रेम, ब्रेकअप आणि आत्महत्या – एक वास्तव घटना

By ज्यो. कौशिक घरत
प्रेम, ब्रेकअप आणि आत्महत्या – एक वास्तव घटना

हल्ली तरुण मुलांचे प्रेम होणे नंतर ब्रेकअप होणे हे नित्याचेच झाले आहे. एकाशी ब्रेकअप झाला तर दुसरा नंतर तिसरा असा काळ आहे. परंतु ब्रेकअप मुळे जीव जाऊ शकतो ? खरे…

हल्ली तरुण मुलांचे प्रेम होणे नंतर ब्रेकअप होणे हे नित्याचेच झाले आहे. एकाशी ब्रेकअप झाला तर दुसरा नंतर तिसरा असा काळ आहे.

परंतु ब्रेकअप मुळे जीव जाऊ शकतो ?

खरे तर लेखाचे शीर्षक वाचून विचित्र वाटेल पण ही सत्य घटना सर्व वाचकांसाठी लिहित आहे जेणे करून ते त्यांच्या पाल्याला वेळीच योग्य ते मार्गदर्शन करू शकतील. ज्योतिष शास्त्राद्वारे ह्या गोष्टीचा आपल्याला अंदाज कसा बांधता येतो हे ह्या कुंडलीत आपल्याला बघायला मिळेल.

Sucide person kundli

एक दु:खद सत्य घटना – प्रेमात ब्रेकअप नंतर तरुण मुलाने आत्महत्या का केली आणि ज्योतिष शास्त्रात याचा संकेत कसा मिळतो ते जाणून घ्या.

वडील सरकारी नोकरीतून रिटायर्ड सोबत वेट लिफ्टिंग मधील नावाजलेले व्यक्तिमत्व. 25 वर्षाचा आताच हातास आलेला मुलगा व लग्नासाठी वयात आलेली मुलगी. वडिलाना जबाबदारीच ओझ वाटत नव्हते कारण मुलगा आपल्याला नक्कीच हातभार लावेल ह्याची त्यांना खात्री होती. पण झालं उलटच ! जबाबदारी उचलायच सोडून मुलालाच वडिलाना खांद्यावर उचलून न्याव लागलं स्मशानात.

का झालं ? कसे झाले ? ह्याची उत्तरे खालील लेखात आहेतच.

प्रेम, ब्रेकअप आणि आत्महत्या – एक वास्तव घटना

तर झालं अस की एक मुलगी नेहमी मुलाच्या घरी यायची. दोघांचं प्रेम होत. लग्न ही करणार होते हे दोन्ही कडच्या पालकांना माहीत होते. पण अचानक मुलीचा साखरपुडा झाला. ह्या मुलाला खूप वाईट वाटले. ही झालेली फसवणूक त्याला सहन झाली नाही. त्यात त्या मुलीच्या होणाऱ्या भावी नवऱ्याने ह्या मुलास फोन वर धमकावले. मुलगा अजूनच टेन्शन मध्ये गेला. शेवटी त्याने आजारी आईला भेटून रात्री स्वतःच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली.

त्याच्या वडिलांची विनंती होती की नक्की ह्याचा मृत्यू असाच लिहिला होता की अजून काय होते हे मी बघावे. सुरुवातीला धाडस होत नव्हते पण शेवटी लिहिले जेणेकरून इतरांना ह्या पासून धडा मिळेल. ही कुंडली मी “भाव नवमांश पद्धतीने” सोडवली आहे ज्याचे माझ्या श्री स्वामी समर्थ विद्यालयात ऑनलाईन कोर्सेस सुरू असतात. ह्या कुंडलीचे भाव नवमांश कुंडलीतील लग्न मीन असून त्याचा स्वामी गुरू लग्न कुंडलीत अष्टम स्थानात शनी बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्या हातून स्वतःचे नुकसान करून घेण्याचा योग म्हणा हवंतर. भाव नवमांश कुंडलीतील अष्टमेश तुळेचा शुक्र असून तो स्वतः लग्न कुंडलीत व्यय स्थानात असून त्याची राशी द्वितीय स्थानात आहे. द्वितीय स्थान स्वयंपाक घराचे द्योतक आहे म्हणून मुलाने गळफास किचन मध्ये घेतला. शुक्र केतु च्या अश्विनी नक्षत्रात असून केतू पंचम स्थानात आहे. पंचम स्थान हे प्रेम प्रकरण दर्शविते. ह्या मुलाने आत्महत्या करण्याचे कारण प्रेम होते हे लग्न कुंडलीत सरळ सरळ दिसते आहे. मुलाचा मृत्यू हे खरतर कुठल्याही बापाला वेदनादायक असते परंतु ह्या वरून आपल्याला काही शिकवण मिळू शकते:

प्रेम प्रकरणात अपयश आले तरी कुणीही आत्महत्या करून ते मिळवू शकत नाही. जान सलामत तो पगडी पचास ! ह्या उक्ती प्रमाणे तो जर जगला असता तर अजून कुणीतरी नवीन व्यक्ती त्याच्या आयुष्यात निश्चित आलीच असती. आत्महत्या करणे हे भ्याडपनाचे लक्षण तर आहेच परंतु कायद्याने व धर्मशास्त्रानुसार अपराध सुद्धा आहे.

अशा केस मध्ये पालकांनी मुलांशी मनमोकळे बोलायला हवे, त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेऊन त्यांना नवीन योग्य मार्ग दाखवायला हवा, गरज असेल तर मानसोपचार तज्ञा कडे घेऊन जायला हवे, जेणेकरून अशा आत्महत्या रोखता येतील. देवाने मनुष्य जन्म काहीतरी चांगले करण्यासाठी दिलाय तो अस आत्महत्या करून वाया घालवू नका.

Read next