तुम्हाला वाचून नवल वाटेल पण काही काही जातकांच्या आयुष्यात स्वतः चे नावावर असे घर कधीच होत नाही.
“साधारण चतुर्थ स्थाना चा उप नक्षत्र स्वामी लाभ व चतुर्थ स्थानाचा कार्येश असल्यास त्या जातकाचे घर होते असा नियम कृष्णमूर्ती पद्धतीत आहे.”
पण काही वेळ जातकाला भरमसाठ पगार असतो, खूप होम लोन मिळू शकते तरी त्याच्या आयुष्यात काही स्वतः चे असे घर पूर्ण आयुष्यात काही होत नाही, काही ना काही अडचणी येतच असतात.
✍ मग पुढचा पर्याय असतो “मोठं भाड्याचे घर”
पण भाड्याचे घर असले तरी ती पण एक वास्तू …म्हणजे वास्तू शास्त्रा प्रमाणेच त्याचेही चांगले/ वाईट परिणाम दिसून येतातच. आपणास अनुभव असेलच की एकाद्या भाड्याच्या घरात रहायला गेल्यावर अनेक प्रकारे आजार, अपयश, इत्यादी गोष्टी चालू झालेले असतात तर कधी कधी खूप यश, धनलाभ, शुभ कार्ये अशी ही फळं मिळतात.
“जरी भाडे कमी असले तरी त्रास जास्त असल्यास काय फायदा?”
भाड्याच्या घरात रहायला जाण्या अगोदर वास्तू कशी आहे ती एखाद्या जाणकार ज्योतिर्विदास विचारल्यास पुढील त्रास काही प्रमाणात आपण टाळू शकता.
कुठे कुठे तर इस्टेट एजंट वास्तू बद्दल खरी माहिती देत नाहीत पण काही वेळेस घराची पूर्ण नवीन रंगरंगोटी पण केलेली असते…
त्यास भुलून आपण राहायला ही जातो पण त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपण चौकशी केल्यानंतर समजते की आपण रहायला जाण्याअगोदरच कुणीतरी तिथे आत्महत्या केलेली असते.
म्हणून ह्या पुढे जरा जास्तच सतर्क रहा.
✍ मान्य आहे की सध्या वास्तूशांती करून घेण्यास थोडा जास्त खर्च होतो तरी माझ्या मते तो करून घ्यावा अथवा रोज “वास्तू पुरुष पूजन” करून वास्तू स्तुती वाचणे, कुलदेवता पूजन, इ. उपाय केल्यास फरक पडू शकतो.
आपला कसा आहे भाड्याच्या घरातील अनुभव?