अगदी हायवे वर काढलेलं हॉटेल/ ढाभा ही का चालत नाही?

Spread the love

कधी कधी स्वयंपाक करण्यात अप्रतिम असणारे लोकं ही हॉटेल काढून आपलं नशीब आजमावयाचा पर्यंत करतात पण हाताला चव असून देखील हॉटेल काही केल्या चालत नाही तर कॅटरिंग केलं तर खूप चालते, असं का होतं? हॉटेल चा विषय हा फक्त रूपक म्हणून वापरावा. सदर लेख सगळ्या धंद्या बद्दल आहे.

ह्याचे उत्तर देताना ज्योतिषाने अगोदर त्याचे धन लाभ योग् कुंडलीवरून नीट पाहून घ्यावेत वरून दशेचे कारकत्व सुद्धा अभ्यासून जातकास मार्गदर्शन करावयास हवे नाहीतर हॉटेल साठी केलेली सगळी इन्व्हेस्टमेंट पाण्यात ही जाऊ शकते.

साधारण पणे द्वितीय, पंचम, षष्ठ, सप्तम, दशम व लाभ आणि व्यय स्थानावरून कुठल्या प्रकारचा व्यवसाय करावा हे सांगता येते व दशा स्वामी वरून तो व्यवसाय होलसेल असावा की रिटेल तेही कृष्णमूर्ती पद्धतिने अचूकपणे सांगता येते. वरील उदाहरणात जातक एका गाजलेल्या हॉटेल मधले नावाजलेले शेफ असून त्याना किमान 20 वर्षापेक्षा ही जास्त स्वयंपाकाचा दांडगा अनुभव होता. रिटायरमेंट नन्तर त्यांनी पीएफ चे काही पैसे हॉटेल मध्ये टाकले होते परंतु एक वर्ष झाले तरी त्यांचे हॉटेल काही चालले नाही म्हणून कुणीतरी माहिती दिल्यामुळे त्यांची पत्रिका बघण्याचा योग् आला होता.  जातकाच्या कुंडली रवी व  कन्या राशी वरून कुकिंग हा व्यवसाय स्पष्ट दर्शवित होती पण चूक झाली होती ती व्यवसाय करण्याच्या पद्धतीची.

जातकाला सध्या चालू असणाऱ्या ग्रहमनावरून त्यांची 500 ते 700 थाळी ची ऑर्डर सहज गेली असती जर त्यांनी ती कॅटरिंग मध्ये ऑर्डर घेतली असती पण हॉटेल मध्ये रोज 15 थाळ्या विकणे ही भारी पडत होते. काही दशेत जातकाकडे हॉटेल सारखे दररोज एक एक अशी गिर्हाईक येत नसतात तर त्यास महिन्यामध्ये मोठया मोठया 4/5 ऑर्डर्स सहज मिळतात. म्हणून त्याना हॉटेल ऐवजी कॅटरिंग च सुचवणे योग्य वाटले. शेवटी पैसे कुठल्या मार्गाने येतो हे महत्वाचे…!

“श्री लक्ष्मी अष्टक” स्तोत्र रोज दोन वेळा संध्याकाळी वाचल्यास पैशाची आवक होऊन ती स्थिर राहते, चणचण रहात नाही. वाचकांनी ह्या तोडगा वापरून अवश्य अनुभव घ्यावा व आपले अनुभव ही कळवावेत.

ज्योतिषी: कौशिक घरत

श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय

(कृष्णमूर्ती, फलज्योतीष व भावनवमांश पद्धतीचे अभ्यासक)

मो. 9833737919


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page