लक्ष्मी नावाच्या एका बाईच्या पतीचे हॉटेल मुंबई शहरात होते. काही कारणाने त्याला त्या वेळेस घाटा होऊन साधारण ₹१,०००/- कर्ज झाले होते. त्या काळी १००० रुपये सुद्धा जास्त मोल राखून असत.
लक्ष्मीचा पती सदाचारी व्यक्ती होता. आता पर्यंत चा त्याचा व्यवहार प्रामाणिक पद्धतीने केलेला असल्याने कर्ज घेतलेल्या लोकांकडून त्याने १ वर्षाची मुदत कर्जफेडी साठी मागून तो सध्याची राहती भाड्याची वास्तू सोडून गावी निघून गेला.
बरेच प्रयत्न केले पण कुठूनही मार्ग काही मिळत नव्हता. नातेवाईक – मित्र – व्यापारी – बँका काही त्याला नवे कर्ज द्यायला किंवा मदत करायला तयार नव्हत्या.
चिंता वाढत होती. आता तर पूर्ण वर्षातल्या मुदती मधून अवघे १० दिवस शिल्लक राहिले होते.
लक्ष्मी ला चिंता लागून राहिली होती की आता तिच्या नवऱ्याला व्यापारी /सावकार यांची बोलणी खावी लागणार, अपमान निमूट सहन करावा लागणार. दुसरा काही पर्याय समोर दिसत नव्हता.
तिने दिवसातले फक्त झोपेसाठी ४ तास सोडून अखंड राम नामाचा जप सुरू केला. दहाव्या दिवशी आश्चर्य झाले. मुंबईत ज्याच्या कडून ते दूध विकत घेत तो भय्या त्यांना भेटायला आला होता. त्याने माहिती दिली की त्यांच्या prize bond च्या एका तिकिटावर त्यांना तब्बल ₹ ७,५००/- मिळाले आहेत. लक्ष्मीच्या पतीने भय्याला त्याच्या ₹४०/- च्या उधारी साठी पाच रुपयांची ८ अशी तिकिटे देऊ केली होती. परंतु भय्या प्रामाणिक असल्याने त्याने फक्त ₹४० + मुंबई हून येण्या जाण्याच्या खर्च कापून राहिलेले पैसे लक्ष्मी च्या नवऱ्याला आणून दिले होते.
अखेर देवाची लीला अगाध आहे. मनापासून मंत्र जपल्यास त्याचे परिणाम निश्चित दिसून येतातच.
आमच्या “उपयोगी मंत्र व यंत्र शास्त्र” च्या दुसऱ्या बॅच चे डेमो लेक्चर आयोजित केले आहे, त्याच्या माहितीसाठी संपर्क साधू शकता.
संकटात “रां ” हा मंत्र किमान १००८ वेळ सलग ४० दिवस जपल्यास कुणाही व्यक्तीस संकटातून निघण्याचा मार्ग सापडतो.
जय श्री राम ! 🌺🙏🌺
@
ज्यो. कौशिक घरत
मो. 9833737919
कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धतीचे अभ्यासक
www. kaushikgharat. com
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व ऑनलाईन ज्योतिष विद्यालय