एकदम निरोगी असा मनुष्य खूपदा कमी वेळाच सापडतो. काही लोकं बोलत असतात की मी पूर्ण निरोगी आहे मला कोणताच आजार नाही पण हे तितकेसे मनाला सहसा पटत नाही.
आता तुम्ही म्हणाल का ?
तर त्याचे उत्तर असं आहे की भले त्याला विशिष्ट प्रकारचे आजार सध्या झालेले नसतील परंतु अपचन होणं /पोटात विनाकारण गॅस होणं/ निरुत्साही वाटणे, इत्यादी प्रकार कमी अधिक प्रमाणात सगळ्याना होतच असतात. मग पूर्ण निरोगी कसे म्हणता येईल बरं ?
मित्रहो, जशी पूर्ण सृष्टी ही पंचतत्वांनी बनली आहे तसेच मनुष्य प्राण्याचे शरीर ही पंचतत्वांनीच बनलेले आहे.
✍ ती पंचतत्व म्हणजे अग्नी-पृथ्वी-वायू-जल-आकाश. प्रत्येक ग्रहास, राशींना काही तत्व दिलेली आहेत.
पंचांगात ग्रह व त्यांचे कारकत्व दिलेले असतात तरी नवीन अभ्यासकांसाठी उदाहरणादाखल काही ग्रह व त्यांचे कारकत्व खाली देत आहे:
✅ बुध-शुक्र-शनी : पृथ्वी तत्वाचा कारक आहे
तर
✅ सूर्य- मंगळ- गुरू: अग्नी तत्वाचा कारक आहे.
✍ जर का ह्या सर्व तत्वात मेळ असला तरच मनुष्य प्राणी निरोगी राहतो पण जरा काही कमी जास्त झालेच तर मग खालील प्रकारचे आजार बिचाऱ्याच्या मागे लागतात:
- अग्नी तत्व : शरीराचे तापमान आणि जठराग्नी चे नियमन करतो. कुंडलीतील हे तत्व जास्त झाले असेल तर जास्त तहान लागणे, फुफ्फुसाची व्याधी सुरू होणे ह्या तक्रारी उदभवतात. त्याच बरोबर राग पटकन येणे, भांडखोर बनणे, छातीत जळजळ होणे, मूत्राशय संबंधी तक्रारी, कावीळ, इत्यादी व्याधी ही जडतात. ह्याच्या उलट म्हणजे अग्नी तत्वाची कमतरता असल्यास उगीच कशाचीही भीती वाटणे, अपचन, कॉन्फिडेंस कमी होणे इत्यादी तक्रारी भेडसावतात.
- पृथ्वी तत्व : बिघडलं तर त्वचा रोग, केस गळणं, डिप्रेशन येणे, दात दुःखी (हिरडी सुजणे) इत्यादी आजार उदभवतात.
- वायू तत्व : बिघडल्यास चक्क श्वसन क्रियेवरच ताण येतो त्यामुळे आपोआप नर्व्हस सिस्टीम खराब होते. मग चक्कर येणे, डोके दुखणे, हाडांची हालचाल होण्यासाठी कष्ट होणे, सांधेदुखी इत्यादी व्याधी उदभवतात. खूप थकल्यासारखे वाटणे, आयुष्यास अतिशय खराब अश्या प्रकारचे आजार ह्या मुळे होत असल्याने वाचकांनी वेळीच त्याची काळजी घ्यावी.
- जल तत्व : बिघडल्यास ब्लडप्रेशर वाढणे किंवा कमी होणे, सारखी लघवीला होणे किंवा पूर्णता थांबून थांबून होणे, घश्याला कोरड पडणे, संतत्ती होण्यात अडचणी निर्माण होणे इत्यादी प्रकारचे आजार संभवतात.
- आकाश तत्व : बिघडल्यास कामवासना प्रबळ होणे किंवा अगदीच कमी होणे, त्या संबधीत भीती वाटणे, अपूर्ण कामवासनेमुळे आपोआप रागीष्ट प्रवृत्ती निर्माण होणे इत्यादी आजार मनुष्यास होतात.
✍ मित्रांनो, वरील लेख वाचून कुठलेही तत्व आपल्या पत्रिकेत कमी अथवा अधिक आढळल्यास लगेच त्यावर उपाय म्हणून ग्रहांची रत्न घालू नका कारण हयात सखोल अभ्यास करुनच निर्णय घेणे सदैव चांगले असते. तशी ओरिजिनल रत्न हल्ली बाजारात कमीच मिळतात परंतु तुमच्या नशिबाने ओरिजिनल मिळालीच आणि ते तत्व अगोदरच जास्त असल्यास अगोदरच्या पेक्षा जास्तच त्रास होऊ शकतो.
☀ उपाय :
- सर्वात पहिला उपाय म्हणजे डॉक्टर कडे जाणे हाच असावा.
- त्या नंतर ही फरक पडत नसल्यास इतर अध्यात्मिक मार्गांनी सुद्धा उपाय करता येतो.
- रेकी हिलींग, ध्यान, योग इत्यादी द्वारे सुद्धा तत्व सुरळीत करता येते.
- यंत्र-मंत्र-तंत्र, ग्रहांची रत्न, वनस्पती तंत्र, जप इत्यादी द्वारे सुद्धा योग्य उपचार करता येतात.
जसे जन्म कुंडलीतील ग्रह स्थिती वरून तत्व पाहता येतात तशीच गोचर भ्रमणामुळे सुद्धा तत्व चांगली-खराब होऊ शकतात. त्याची माहिती वेळोवेळी घेत राहणे नेहमी फायदेशीरच ठरते.