कधी कधी आपण ऐकतो की एखाद्याने घर बांधले आणि त्याला काही वर्षांत खूप यातना सहन कराव्या लागल्या.
खरंतर घर बांधणे ही सोपी गोष्ट नाही. त्यात खूप पैसा लागतो तसेच शारीरिक व मानसिक ओढाताण ही होते.
घर जरी पूर्ण वास्तूशास्त्रानुसार बांधलेले असले तरी मग का काहीजणांना घर बांधल्यावर असे अशुभ अनुभव येतात ?
ह्याचे कारण तुमचा गुहारंभ मुहूर्त व गोचर भ्रमण मेळ खात नाही.
ग्रह त्यांच्या भ्रमण कक्षेतून जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या राशी-नक्षत्रातून भ्रमण करतात (म्हणजे प्रवास करतात) त्याला ग्रहांचे गोचर म्हणजे चालणे म्हणतात. प्रत्येक ग्रह भ्रमण काही सगळ्यांच्या जन्म कुंडलीत शुभ किंवा अशुभ नसते तर काहींना ते शुभ जाते तर काहींना अशुभ.
समजा आता रवी हा ग्रह मिथुन ह्या बुधाच्या राशीत आहे तर १६ जुलै ला तो चंद्राच्या कर्क राशीत जाईल तर त्याला रवीचे गोचर भ्रमण कर्क राशीतुन होत आहे असे बोलण्याचा प्रघात ज्योतिष शास्त्रात आहे.
कर्क राशी कुणाच्या लाभ स्थानात असेल तर कुणाच्या अष्टम स्थानात किंवा अजून कुठल्याही स्थानात असू शकेल म्हणजे “एकच राशी दोन्ही जातकांची असेल तरी प्रत्येकाला रवीचे कर्क राशीतील भ्रमण वेगवेगळी फळ देणार हे नक्की.” त्यात सुद्धा तो कोणत्या नक्षत्रात आहे त्यावरून देखील त्याची फळ देण्याची क्षमता अभ्यासता येईल म्हणजे फक्त चंद्र राशींवरून गोचर भ्रमणाचे फायदे-तोटे बघण्यात काहीच हशील नाही तर तो प्रत्येकाच्या जन्म कुंडली प्रमाणेच बघितला पाहिजे हे आपणास आता समजलं असेल.
म्हणूनच काही जातकांच्या विनंतीवरून नुकतीच आम्ही “पर्सनलाईज्ड गोचर भ्रमण सेवा” लाँच केलेली आहे त्याला प्रतिसाद ही उत्तम मिळाला आहे. ह्या सेवेविषयी आपल्याला अधिक माहिती खालील लिंक वर क्लिक केल्यास मिळू शकते.
https://www.facebook.com/109035514145942/posts/351483656567792/?sfnsn=wiwspmo
“नवीन घराचा गुहारंभ कधी करावा ह्याचे काही नियम वास्तूशास्त्रात आहेत; त्याचा वापर केल्यास निश्चित फायदा होतो.”
गृहारंभी रवी ग्रह खालील राशीत असताना गृहारंभ केल्यास असे फायदे जाणावेत:
१.मेष: शुभ
२. वृषभ: धनहानी
३. मिथुन: मृत्यू
४. कर्क: शुभ
५. सिंह: सेवक लाभ
६. कन्या: रोगकारक
७. तुला: सौख्य
८. वृश्चिक: धनधान्य
९. धनू: महा-हानीकारक
१० मकर: धनलाभ
११ कुंभ: रत्नलाभ
१२ मिन: दु: स्वप्न
चातुर्वर्ण्य पध्दतीने खालील ग्रहबळ बघून विचार करावा :
१. क्षत्रिय: रवी व मंगळ
२. वैश्य: चंद्र व बुध बळ
३. शूद्र: शनी बळ
४. ब्राह्मण: गुरू बळ
[अगदीच शक्य नसल्यास सर्व वर्णांनी रवी व चंद्र बळ पाहणे आवश्यक आहे.]
आता हेच शुभाशुभ प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे गृहारंभा वेळी कसे पहावे ह्या बद्दल माहिती खालील प्रमाणे जाणावी:
कर्त्यास जर रवी गोचर अशुभ असेल तर त्याला स्वतः ला पिडाकारक सिद्ध होईल.
चंद्र गोचर अशुभ असेल तर त्याच्या पत्नीला पीडाकारक.
शुक्र गोचर अशुभ असेल तर त्याच्या व्यवसायास / संपत्तिस हानिकारक.
गुरू गोचर अशुभ असेल तर सुख- संपत्ति चा नाश.
बुध गोचर अशुभ असेल तर त्याच्या संतत्ती व नातवंडांना हानिकारक.
मंगळ गोचर अशुभ असेल तर त्याच्या भावंडांना अशुभ.
शनी गोचर अशुभ असेल तर त्याचे नोकरवर्ग काम सोडून जातील.
म्हणून घर बांधताना कृपया योग्य मुहूर्तावरच बांधकाम सुरू करा व सुखी-समाधानी आयुष्य जगा.