खूप सारे जातक वरील प्रश्न गुणमेलन करण्यासाठी आलेले असताना विचारत असतात.
🌀 कारण कुणीतरी सांगितलेले असते की एकच महादशा वधू-वरास चालू असेल तर त्याची अनिष्ट फळे दोघांना भोगावयास लागतात, म्हणून लग्न करू नका.
पण हे खरे आहे का?
वरील विधान पूर्ण सत्य आहे असे म्हणणे चुकीचे होईल.
कारण अशी अनिष्ट फळे खूप कमी जणांना भोगायला लागू शकतील पण त्याचेही चान्सेस खूपच कमी आहेत.
उलट दोघांना ही जरी एकच दशा चालू असेल तरी वैवाहिक जीवन उत्तमरीत्या पार पडू शकते असे आपण म्हणू शकतो.
का असे असेल?
कृष्णमूर्ती पद्धतीत ह्यावर खूप चांगला अभ्यास झाला आहे त्याचा वाचकांना नक्की उपयोग होईल.
✍समजा विशोत्तरी महादशेप्रमाणे जरी वधू-वराची एकच महादशा म्हणजे दोघांना “गुरू” महादशा विवाह करताना चालू असेल तरी त्यांची लग्न रास वेगवेगळी असू शकते.
✍ एकाचा दशास्वामी वेगळ्या नक्षत्रात किंवा वेगळ्या उप-नक्षत्रात असू शकतो.
✍ अजून अधिक बोलायचे झाल्यास महादशा स्वामी एकाला शुभदायी तर दुसऱ्यास अशुभ फल देणारा ही असू शकतो.
✍ प्रत्येकाला चालू अंतर्दशा वेगवेगळ्या असू शकतात.
✍ दशा स्वामी वेगवेगळ्या राशीत असू शकतात.
उदाहरण म्हणून समजूया की वधू-वरास लग्न करताना “गुरू महादशा” चालू आहे. दोघांचाही चंद्र धनु राशीत आहे पण दोघांची जन्मकुंडलीत लग्न रास वेगळी आहे.
तर आपल्याला समजून येईल की जेव्हा जेव्हा दशास्वामी नवऱ्याच्या कुंडलीत बायकोला दागिने घेण्यासाठी खर्च दाखवील तेव्हा तेव्हा बायकोला दागिना मिळेल पण त्याच ठिकाणी नवऱ्याच्या कुंडलीत बँकेतील जमापुंजी कमी होणारच.
जेव्हा बायकोच्या कुंडलीतील दशास्वामी दागिने गहाण ठेवणे/ विकणे अशी फळे देईल तेव्हा नवऱ्याला त्याचा आर्थिक लाभ नक्कीच होईल त्याचे कर्ज फेडण्यासाठी किंवा कर्जफेड नसेल तर त्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी.
बाळाच्या जन्मासाठी जेव्हा बायको हॉस्पिटलमध्ये संतत्ती होताना शारीरिक त्रास सहन करत असेल त्याच वेळी तोच दशा स्वामी नवऱ्याच्या कुंडलीत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असेल की कधी एकदा बाळ जन्म घेतेय आणि कधी मी मित्रमंडळी मध्ये पेढे वाटतोय.
[म्हणजे इथे बायकोला जरी दशा स्वामी शारीरिक त्रास देणारा असला तरी नवऱ्याच्या पत्रिकेत तोच आनंद/ लाभ करून देणारा ठरेल.]
म्हणून जरी वधू-वराची लग्न करतेवेळी जरी एकच रास असेल आणि दशास्वामी जरी एकच असले तरी कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता लग्न करू शकता.
“आपले वैवाहिक जीवन उत्तम राहो हीच प्रार्थना.”