काही दिवसांपूर्वीच तेवीस वर्षे वयाच्या एका बीकॉम झालेल्या तरुणाचे करिअर गायडन्स करण्यासाठी प्रश्न विचारला गेला होता.
दहावीत ८४ %, बारावीत ८७% आणि पदवी परीक्षेत ८५% मिळाले होते. खरं तर दोन्हीही बोर्डात मेरिट मध्ये येण्याची बुद्धिमत्ता असून देखील येऊ शकला नाही कारण नेमके परीक्षेच्या वेळेस येणारे आजारपण.
✍ ज्यांचा रवी बाराव्या भावात असतो त्याना अचानक तब्येत बिघडण्याचे प्रॉब्लेम्स येतच असतात. बरा चंद्र २,६,८,१२ स्थानात नव्हता म्हणून नाहीतर डोळ्यांचे विकार पण मागे लागले असते बिचाराच्या.
पत्रिका बघितल्यावर समजलं की गुरू दशम स्थानात असून स्वतः च्याच राशीत असून रेवती ह्या बुधाच्या नक्षत्रात होता. नक्षत्र स्वामी बुध लाभात म्हणजे दुग्ध शर्करा योग च.
मंगळ महादशा चालू होती. मंगळ शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र पंचमात होता म्हणून त्याने लिहून पाठविलेले होते की इंटेरिअर डिझाइन, शेअर मार्केट चे कोर्सेस की सी.ए. कोर्स ?
🔰 शुक्राचा प्रभाव कला, आर्थिक गोष्टींबद्दल आवड निर्माण करतो म्हणून त्याने जास्तीचे ऑप्शन वरीलप्रमाणे दिले होते. आता काय व्यवसाय करणार हे शोधायचं काम थोडं जिकरीचेच होते.
✍ रवी बाराव्या भावात जर असेल तर अशा व्यक्तींचा उज्ज्वल काळ वयाच्या साधारण २५ व्या वर्षांपासून सुरू होतो तो पर्यंत खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
वरील ग्रहस्थिती जन्मकुंडलीत असणाऱ्या जातकांना व्यवसायात खूप भरभरून यश मिळते, कितीही छोट्या प्रमाणात धंदा सुरू केला तरी पुढे त्याचा वटवृक्ष नक्कीच होतो.
🔰 अशा जातकांना जन्मभूमीत जास्त यश न मिळता परदेशी गेल्यास मनासारखं यश मिळते. म्हणून जातकाला शेअर मार्केट शी रिलेटेड कोर्स करायला सांगितला पण दशमातील गुरु उच्च पद देणारा म्हणून त्याला अमेरिकन C.F.A. कोर्स करायला सांगितला कारण पुढे येणारा दशास्वामी शिक्षणात उत्तुंग यश तर देणार होताच पण सोबत स्कॉलरशिप पण मिळणार होती.
तसा C.A. कोर्स पण तो करू शकला असता पण मायदेशी त्यात अडचणी आल्या असत्याच वर तो काही C.F.A. सारखा ग्लोबल कोर्स तर नाही म्हणून म्हटलं C. F. A. च करा. त्याच कोर्स शी शिडी बनवून तुम्हाला परदेशात व्यवसाय करणे सोपे होईल.
C.F. A. ची फी पण प्रत्येक टर्मसाठी साधारण ₹५०,००० – ₹ ७५,००० असते जी जातकाला सहज परवडणारी नाहीच पण एकंदर पत्रिका पाहून सांगता येऊ शकते की त्याने जर भरपूर अभ्यास केला तर त्याला स्कॉलरशिप सहज मिळू शकते.
पण यशाला आरोग्याची साथ मिळेल का ?🤔
जातकाच्या भावी आयुष्यात करिअर मध्ये भरभरून यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🙏