प्रश्न होता की अमुक व्यक्तीच लग्न अगोदरच झालं आहे पण आम्हा एकमेकांना दोघे आवडतो तर मी त्याच्याशी लग्न करणे ठीक होईल का?
स्त्री एकटी असली की तिच्या व्यथा तिच्या शिवाय दुसऱ्याला नाही समजू शकत.
कामावर, राहत्या परिसरात होणारा त्रास, स्त्रीलंपट पुरुषांकडून स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघणं, सारखी वखवखलेली नजर झेलत जगणं म्हणजे काही सोपं नाही.
त्यात घटस्फोटित, विधवा यांचे कमी अर्थाजन, संरक्षण नाही अशा परिस्थितीत स्त्री सुलभ मन कुठेतरी आधार मिळावा, आपलं ही कोणीतरी असावं हेच बघत असतं आणि त्यात वाईट असं काहीच नाही.
प्रत्येकाला अधिकार आहे कसं आयुष्य जगायचं!
म्हणून वरील प्रश्नाचं मला तरी नवल न वाटता उत्तर शोधण्यासाठी प्रश्न घेतला.
“खरं तर प्रत्येक घरातून अशा स्त्रियांना आधार, सरंक्षण मिळायला हवे पण दुर्देवाने ते मिळत नाही म्हणून असे प्रश्न विचारण्याची वेळ येते अबला स्त्रियांवर.”
त्यातही एकाचीच जन्म वेळ, तारीख होती तर दुसऱ्याची वेळ नक्की माहीत नव्हती म्हणून भावनवमांश पद्धतीने प्रश्न कुंडली मांडून उत्तरं दिलं. ह्यातही कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे अचूक उत्तर मिळतं.
लाभ, पंचम व दुसऱ्या विवाहाच्या स्थानामधील शुभ-अशुभ योग पाहून उत्तर दिले की करू शकता दुसरं लग्न पण अडीच वर्षानंतर.
✍ तसं हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे पहिली पत्नी जिवंत असताना अथवा पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना दुसरे लग्न करणे म्हणजे गुन्हा असतो हे ही सांगायला विसरलो नाही.
पण, मिया बीबी राजी तो …. 😄
पण जरा जपून बरं का!…
कारण गेल्याच आठवड्यात सुप्रिम कोर्टाने दिलेला ऐतिहासिक निर्णय वाचनात आला आणि मनातून हा लेख लिहिण्याची तीव्र ओढ तयार झाली.
✍ सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे:
🔰 जर मयत व्यक्तीच्या दोन पत्नी असतील तर त्याच्या संपत्तीवर अधिकार फक्त पहिल्या पत्नीचाच असतो.
🔰 दुसऱ्या पत्नीला त्यातून काहीही मिळत नाही.
🔰 पण जर दुसऱ्या पत्नीकडून मयत व्यक्तीला जर संतत्ती झालेली असेल तर दोन्ही पत्नींच्या मुलाबाळांना मयत व्यक्तीच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो.
🌀 आता तुम्ही म्हणाल की मला नाही पण माझ्या मुलांना तरी मिळेल अधिकार मग बिघडलं कुठे? 🤔
⭐ पण जरा विचार करा…. सगळ्यांचीच संतत्ती काही श्रावण बाळासारखी नसते.⭐
❓ जर तुमच्या ऐन म्हातारपणी जर तुमच्या स्वतःच्या संतत्ती ने जर तुम्हाला आसरा दिला नाही तर तुमची काळजी कोण घेणार?
❓ संपत्तीं तुम्ही लग्न केल्यामुळे त्याला मिळाली आहे हे जरी खरे असले तरी त्या संपत्तीवर पूर्ण अधिकार फक्त तुमच्या संतत्तीचाच असेल. तुमचं मुलं त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून बेदखल करू शकेल.
म्हणून जातक कुठल्याही भावनेने निर्णय घेण्यापेक्षा बुद्धीने निर्णय घ्या.