नेहमीच दहावी-बारावी च्या रिझल्ट नंतर “कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल” व “कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेऊ” असे प्रश्न अनेक पालक मला विचारत असतात.
कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धती ने हे सांगता येते पण जेव्हढे म्हणावे तेवढे काही ते शोधणे सोपे नसते बरं!
“खरं म्हटलं तर द्राविडी प्राणायामच असतो करिअर कशात करायचे हे शोधणे म्हणजे.”
✍ रुलिंग प्लॅनेटस च्या मदतीने जसे किती टक्के गुण मिळतील हे सांगता येते तसेच उप नक्षत्र स्वामींच्या मदतीने एखादा विद्यार्थी करिअर कशात करेल हे ही सांगता येते.
दहावी- बारावी नंतर नक्की कुठले शिक्षण घ्यायचे हे सांगण्यासाठी पहिला तो विद्यार्थी पुढील आयुष्यात नक्की काय व्यवसाय करणार आहे हे पहावे लागते. नोकरी करणार की बिझनेस हे नक्की करावे लागते.
चतुर्थ व नवम भावाचा उप नक्षत्र स्वामी, राशी उच्च शिक्षण कसे होईल हे सांगतात. चतुर्थाचा उप नक्षत्र स्वामी अष्टमात, अष्टमेश किंवा अष्टमेशच्या नक्षत्रात असेल तर शिक्षणात अडथळे येतात काही अपवाद वगळता.
अपवाद: इंजिनिअरिंग, मेडिकल सर्जरी, विम्याशी रिलेटेड पदवी कोर्स
✍ कधी कधी शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून घरापासून पाल्याला दूर ठेवण्याचा सल्ला ही द्यावा लागतो अन्यथा शिक्षणात खंड पडू शकतो.
✍ विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, चपळता, गुण- अवगुण, पालकांची आर्थिक क्षमता हे सगळं पाहून कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा ह्याचा सल्ला देणे अभिप्रेत असते.
अन्यथा एकाद्या विद्यार्थ्याला गुण चांगले असतील पण जर आर्थिक पाठबळच नसेल तर सध्याच्या परिस्तिथीत मेडिकल सारख्या क्षेत्रात प्रवेश घ्या म्हणून सांगणे हास्यास्पद होईल.
🔱 जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा काही समाजपयोगी संस्था, योजनांची माहिती अशा विद्यार्थ्यांना नक्कीच द्यावी.
इंटरनेट वर पण स्कॉलरशिप कुठल्या आहेत याची माहिती उपलब्ध आहे. गुगल द्वारे आपण त्याची माहिती घेऊ शकता.
उदाहरण म्हणून एक वेबसाईट खाली देत आहे त्याचा फायदा घ्यावा ही विनंती!
https://www.google.com/amp/s/www.scholarships.net.in/list-of-scholarships-in-india
कधी कधी शिक्षण वेगळ्या क्षेत्रात आणि व्यवसाय वेगळ्या क्षेत्रात असेही महादशेप्रमाणे होऊ शकते. त्यामुळे सखोल अभ्यास करावा लागतो.
उदा. श्री. रतन टाटा (आर्किटेक पदवी) व “चला हवा येऊ द्या”😂 फेम डॉ. निलेश साबळे चे उदाहरण आपण घेऊ शकतो
💠 नविन ज्योतिर्विदांच्या अभ्यासासाठी खालील काही उपयुक्त टिप्स शेअर करत आहेत, त्या वापरून आपला अनुभव लेखकास नक्की कळवावा:
१. प्रथम जातकाची बुद्धिमत्ता किती आहे हे कुंडलीतील बौद्धिक राशींवरून पडताळून घ्यावी.
२. धन, षष्ठ, दशम, नवम व लाभ स्थान व त्यातील ग्राहयोगाचा नीट अभ्यास करावा. परस्पर शुभ-अशुभ योग पहावेत.
३. कोणते ग्रह चर-स्थिर-द्विस्वभाव राशीत आहेत, मित्र गृही – शत्रू गृही आहेत, कुठल्या तत्वात म्हणजे पृथ्वी-अग्नी- वायू की जल आहेत हे तपासावे.
४. जातकाच्या महादशा – अंतर्दशा ही अभ्यासाव्यात.
५. धन सहम कुठे पडला आहे हे ही महत्वाचे.
६. जातकाची आवड, सध्याची आर्थिक स्थिती ही अभ्यासणे गरजेचे आहे.
७. सर्वात महत्वाचे म्हणजे रुलिंग प्लेनेटस वरून जातकाची जन्मवेळ अचूक आहे का हे ही प्रथम पाहून घ्यावे अन्यथा जन्मवेळ शुद्धी प्रक्रियेने त्यात सुधारणा करून सल्ला देणे.
“भविष्य कथन करताना अचुकते साठी सध्या मिळालेले मार्क्स वर जास्त भर न ठेवता कुंडलीतील ग्रहांचा अभ्यास करून यथायोग्य सल्ला द्यावा.”
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन! 💐