बऱ्याच मुलीच्या आई वडिलांना हा यक्ष प्रश्न पडलेला असतो की आमच्या मुलीच्या विवाहा नंतर ती आमच्या पासून खूप दूर जाईल का ?
कारण ही तसेच असते.
आता पर्यन्त तळ हातावरील फोडा प्रमाणे जपलेला त्यांचा काळजाचा तुकडा थोड्याच दिवसात एका परक्या कुटुंबात विवाह होऊन जाणार असतो. पण विवाह टाळणे सुद्धा शक्य नसते म्हणून पालकांकरवी एक गोष्ट मात्र प्राथमिक तत्वावर केली जाते की होणारा जावई हा आपल्याच शहरातील किंवा जिल्ह्यातील शोधणे.
ठरवून सगळे झाले असते तर कशाला लोक ज्योतिषांकडे गेले असते. नियती परीक्षा बघायला तयारच असते. ज्याचा विचार करावा नेमके त्याच्या उलट घडत असते. तुमच्या कडे कितीही पैसा – संपत्ती असो नियती पुढे कुणाचे काही चालत नाही. जिथे विवाह व्हायचा असेल तिथेच होतो.
मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि तिचे सासर जर जवळ असेल तर लवकर तिची ख्याली खुशी आपल्याला करता येते परंतु जर ती खूप दूर गेली तर तिची भेट होऊनच सर्व समजते. आई – बापाची काळजी त्रयस्थ व्यक्ति कधीही समजू शकणार नाही, नाही का ?
पण तुमच्या काळजाचा तुकडा विवाह होऊन किती दूर जाणार आहे हे मात्र कृष्णमूर्ति ज्योतिष पद्धतीने सहज समजते. कसे ते पाहूया ?
नियम :
सर्व प्रथम तुमच्या मुलीची कृष्णमूर्ति पद्धतीची सूक्ष्म पत्रिका काढून घ्यावी.
त्या नंतर त्यातील लग्न कुंडली अभ्यासावी. जर लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात नैसर्गिक शुभ ग्रह असतील तर ती तुमच्या असपासच विवाह करून जाईल आणि जर जास्त नैसर्गिक पाप ग्रह असतील तर मात्र तुमच्या घरापासून खूप दूर ती विवाह होऊन जाईल.
असे साधे सोपे कृष्णमूर्ति पद्धती चे नियम आपल्याला शिकायला आवडत असल्यास कृपया आमच्या वेबसाइट च्या कोर्स सेक्शन मध्ये जाऊन खाली दिलेला फॉर्म भरा किंवा आमचे फोनवरून कन्सल्टेशन हवे असल्यास खालील मोबाइल नंबर वर whatsapp मेसेज करा.
ज्यो. कौशिक घरत
मो. 9833737919
KP always best