आपण आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या शास्त्राला अंधश्रद्धा मानून त्या कडे दुर्लक्ष करत होतो. Actually ही इंग्रजांची खेळी होती परंतु आताचा काळ बदलतोय.
आताचे तरुण ह्याचा प्रॅक्टिकल अनुभव घेऊन स्वतः ही शिकायला लागलेले आहेत. भारत परत सोने की चिडिया बनण्यासाठी उत्सुक आहे.
तुम्ही म्हणाल सोने की चिडिया भारत पहिला होता कारण तेव्हा सोने जास्त असेल भारतात, पण आता तर महागाई आहे.
असेलही, पण सोनं म्हणजे तुम्ही तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे ह्यावर सर्व अवलंबून आहे. सोने पैसे चोरीला जाऊ शकतात, खर्च होऊन नष्ट होऊ शकतात परंतु विद्येचे तसे होत नाही.
जरी तुम्ही सोन्याचा विचार करत असाल तर तेही त्या काळात शक्य का होते ह्याचे उत्तर ह्याच विद्या आहेत:
आरोग्यासाठी आयुर्वेद, इतर चिकित्सा व मंत्र यंत्र शास्त्र होते. ज्या योगे झालेला आजार लवकर व कमी खर्चात बरा होत होता. घरोघरी बुजुर्ग मंडळीना ह्या गोष्टी अवगत होत्या म्हणून तर “आजीबाईचा बटवा” अद्याप प्रसिद्ध आहे.
आताच्या आजी होणाऱ्या महिलांकडे हे शास्त्र आहे की नाही ह्याची मात्र गॅरंटी देता येत नाही. कारण अवगत व्हायला पहिला शिकायला नको का ? आता डेली सोप चा चष्मा मात्र आवर्जून प्रत्येक घरात सापडेल.
प्रत्येक घरी सोने कसे असेल ?
“घरीच उपचार व्हायचे,
+
precaution म्हणून काही स्तोत्र व मंत्र रोज जपले जायचे,
+
सकस अन्न तेही भूक भागविण्यासाठी खाल्ले जायचे त्यामुळे आजार दूरच राहायचे
+
अती धनाचा संग्रह नाही की लोभ नसायचा यामुळे कोर्ट कचेऱ्या कमीच व्हायच्या”
ह्या सर्वात जे पैसे वाचायचे त्यातून त्या काळी व्यवहारात सर्वात उपयोगी श्रेष्ठ धातू म्हणजे सोने घेणे सर्वांना शक्य व्हायचे. घरोघरी सोने असेल तर तो देश सोने की चिडिया म्हणून का नाही ओळखला जाणार
विद्या वाटल्याने वाढते. (कुणाला द्यावी ह्या साठी सुद्धा नियमावली आहे बरं!)
हल्ली तुम्ही बघत असाल की खरी विद्या ज्याच्याकडे आहे ते दुसऱ्याला शिकवत नाहीत त्यामुळे असंख्य विद्या लोप पावल्या आहेत, परंतु आता काही स्वतः शिकून दुसऱ्यास ही ती शिकवू लागलेत.
गरज आहे प्रोत्साहन देण्याची !
©
ज्योतिषी: कौशिक घरत
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व ऑनलाईन विद्यालय
(कृष्णमूर्ती, फलज्योतीष व भावनवमांश पद्धतीचे अभ्यासक)
मो. 9833737919