हा प्रश्न आपल्या पैकी काही जणांना नक्की पडला असेल तर त्याचे उत्तर हो असे आहे.
योग्य रीतीने मंत्र शास्त्र योग्य कारणासाठी वापरले तर मंत्र शास्त्र नेहमी फल देते.
गणपती पूर्वीचीच केस सांगतो एका मुलीची :
ही मुलगी जुळ्या बहिणीनं मधली लहान बहीण काही मिनिटांचा जन्माचा फरक फक्त. नुकताच दोघींना सेम टू सेम मार्क्स इयत्ता दहावी मध्ये मिळून अकरावी सायन्स ला पुण्यात एडमिशन मिळाले होते.
अभ्यासात दोघी ही सेम… कोणच कमी नाही.
अकरावी परीक्षा सुरू झाली तशी ह्या मुलीला चक्कर येणे – बसल्यावर सुद्धा, भीती वाटणे, पोटात दुखणे असे प्रकार सुरू झाले.
माझ्या बरोबर फोन वर हे discuss केल्यावर पहिल्यांदा मला वाटले की सायन्स कठीण जात असेल, म्हणून बहुधा परीक्षेचे टेन्शन आले असावे. (ह्याला exam fobia म्हणतात ) तर तसेही नव्हते.
मग मात्र कुंडली बघितली आणि समजलो. त्या मुलीची ज्या दिवशी सकाळी कुंडली पाहून उत्तर सांगितले नेमके त्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिला एका चांगल्या डॉक्टर कडे तपासण्यास नेले होते.
परीक्षेचे पेपर चालू होते, दुसऱ्या दिवशी ही पेपर होताच.
विचार केला की वडिलांकडून आग्रह झाला असावा डॉक्टर कडे नेण्याचा…आणि ते सर्वतोपरी योग्यच होते.
डॉक्टरांचे म्हणाले की उद्या हिला आपण admit करून ४८ तास observation खाली ठेवू आणि वाटल्यास treatement करू. यात ट्रीटमेंट surgery सारखी होणार होती.
सकाळी मी त्यांना उत्तर देताना सांगितले होते की हिला जो काही आजार झाला आहे त्याची कारणे वेगळी आहेत. काही मंत्र लिहून पाठविले होते ते सांगितल्या प्रमाणे जर केले तर तिला काही दिवसात बरे वाटेल.
वडिलांनी ऐकले नसावे, डॉक्टर कडे गेलेच दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी ह्या मुलींनी सर्व मंत्र मी सांगितल्या प्रमाणे पूर्ण केले होते. छान झोप सुद्धा लागली होती. डॉक्टरांनी तिला परत तपासले तर “सध्या हिला कुठलेही आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत म्हणून admit करण्याची गरज नाही – लागल्यास पुढील महिन्यात पुन्हा या” असे सांगून बोळवण केली.
दुसऱ्या दिवशी ह्या मुलीच्या आईचा संध्याकाळी फोन आला : म्हणाल्या मुलीने हट्ट केला म्हणून अवेळी फोन करावा लागला तुम्हाला, बोलू शकता का ?
मी : हो, काय झालं ?
आई : ती म्हणते की त्या मामांनी मंत्र दिले त्यांच्याशी मला बोलायचे आहे.
मुलगी : thank you मामा! आजचा पेपर खूपच छान गेला, झोप सुद्धा छान लागली मला. पण थोडी भीती वाटते. काय करू?
विद्यार्थी बरा असो की आजारी परीक्षेची भीती मनात प्रत्येकाच्याच असते हे समजून तिला म्हणालो काही घाबरु नको…मंत्र रोज न चुकता कर अभ्यासासोबत …. हळू हळू भीती जाईल.
पुढील पेपर साठी Best of Luck !
आपले मंत्र शास्त्र जिंकले याचा अभिमान वाटला.
ज्यो. कौशिक घरत
स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व विद्यालय
कृष्णमूर्ती व भाव नवमांश ज्योतिष पद्धतीचे अभ्यासक
WhatsApp: 9833737919