विश्वास असेल तरच व्यवहार होतो असे कुणी म्हटले तर खर तर चूक होऊ शकते कारण तुम्ही कुणावर विश्वास ठेवल्या शिवाय व्यवहार कदापि होऊ शकणार नाही हेच त्रिवार सत्य आहे.
आपल्या भारतीय ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनानंतर कृष्णमूर्ती यांनी ज्योतिष शास्त्रात बरेच संशोधन केलेले आहे हे आपल्याला माहीत असेलच.
त्यांच्या पद्धतीत त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने मांडली ती ही की कोणत्या व्यक्ती जातकाला उपयोगी होतील आणि कोणत्या व्यक्ती जातकाशी विश्वास घात करू शकतील म्हणजेच ज्या व्यक्तींमध्ये जातकाचे नुकसान होऊ शकते.
नियम एकदम साधा सोपा आहे:
१. स्वतःची जन्म कुंडली कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे बनवून घ्या
२. त्यातील अष्टम व व्यय स्थानाचे उप नक्षत्र स्वामी बघा
३. ज्या व्यक्ती बद्दल तुम्हाला शंका आहे त्याची ही वरील प्रमाणे जन्म कुंडली काढून त्या व्यक्तीचे जन्म वेळेचे रुलिंग प्लॅनेट काढा
४. जर क्रमांक ३ मधले ग्रह जर क्रमांक २ च्या ग्रहांबरोबर जुळत असतील तर ती व्यक्ती तुमचा विश्वासघात करून तुमचे नुकसान करेल.
इतकी साधी पद्धती आहे.
©
ज्यो. कौशिक घरत
(कृष्णमूर्ती व भाव नवमांश पद्धतीचे अभ्यासक)
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय व ऑनलाईन ज्योतिष विद्यालय
व्हॉट्सॲप: 9833737919