पालकांची परीक्षा

Spread the love

 

दहावी – बारावी नंतर काय ? हा प्रश्न सगळ्याच पालकांना आता पडला असणार. मुलांची परीक्षा होऊन आता रिझल्ट लागला असला तरी पालकांची खरी परीक्षा आता सुरू झालेली असेल.

कुणाला मार्क्स कमी पण घरचा आर्थिक पाठींबा जास्त तर कुणाला मार्क्स जास्त तर आर्थिक पाठबळ यथातथाच किंवा काही जणांना दोन्ही गोष्टी मुबलक असतील पण करियर ची आपली दिशा काय ठरवायची हे अद्याप समजले नसेल.

त्यात भरीस भर म्हणजे आताच्या शैक्षणिक पद्धतीमुळे पूर्वी जेवढे स्वप्नात पण मार्क्स यायचे नाहीत तेव्हढे आपल्या पाल्यांना मिळालेले बघून पालक वर्गाची चिंता अजून वाढलेली दिसेल कारण जेव्हढे मार्क्स मिळालेत तेव्हढी खरचं बुद्धिमत्ता आपल्या पाल्याची आहे की नाही हे प्रत्येकजण जाणतच असतो. मग करिअर बाबत मोठा निर्णय घेताना कुठे आपण चूक तरी करीत नाही आहोत ना असे वाटणे साहजिकच आहे.

कृष्णमुर्ती जोतिष पद्धतीने विद्यार्थी काय शिक्षण घेईल व पुढे काय करीअर करेल ह्याचे भाकीत करता येते. म्हणून तज्ञ ज्योतिषांना पाल्याची कुंडली दाखवून त्यांचे मार्गदर्शन जरूर घ्या.

कलियुगात शुक्र ग्रहाची सत्ता सर्वात जास्त चालू असलेली आपल्याला दिसून येईल. शुक्र  मौज मजा, पैसा – प्रसिध्दी, आराम, सुंदरता ह्याचा कारक. त्याच्या जोडीला राहू फिल्म लाईन, इंटरनेट, परदेश प्रवासाचा कारक ग्रह.

ह्या दोन्ही ग्रहांचे प्रभुत्व हल्लीच्या पिढीवर नाही दिसले तर अजब मानावे लागेल. कारण तुम्ही पास झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा की तुम्हाला आयुष्यात तुमच्या करीअर कडून काय अपेक्षा आहेत ? मोठे होऊन तुम्हाला कोण व्हावेसे वाटते ?

Image Credit: Google images

मुलं उत्तर देतील की मला मोठी गाडी, स्वतःचा 4 BHK चा फ्लॅट, भरपूर पॅकेज हवे आहे. वर्षातून जमल्यास किमान एक वेळ मोठ्या परदेशी टूर ला जाण्यास पण मला आवडेल.

पण त्याला भविष्यात काय बनायचे आहे हे तो सांगणार नाही.

तुम्ही जरी प्रश्न रिपीट केलात की मी विचारतो/विचारते  की तुला डॉक्टर, इंजिनियर, वकील सारखे कोण बनायचे आहे हे सांग ?

तर मुलं चटकन म्हणतील की ज्याच्यातून माझ्या सर्व  आशा पूर्ण होतील असे काहीही मला व्हायला आवडेल.

कोण म्हणेल मला youtuber व्हायला आवडेल कारण त्यात खूप सारे पैसे मिळतात, घरी बसून मस्त आरामात काम करता येते तर कोणी म्हणेल की अमुक अमुक ओळखीच्या मुलाने अमुक अमुक कोर्स केला तर त्याला इतके चांगले पॅकेज मिळाले म्हणून मला तोच कोर्स करावा वाटतोय.

आता विद्यार्थ्याचे उत्तरात तुम्हाला पैसा, प्रसिध्दी, इत्यादी शुक्र व राहूचे कारकत्व दिसून येईल.  पण हे सगळे फसवे आहे. कलियुगात मायेची बऱ्याच लोकांना भुरळ पडते पण मायेचे आवरण नष्ट करणाऱ्या शनी ग्रहाची दशा किंवा साडेसाती येते किंवा  अपयशाची मालिका सुरू होते  तेव्हा सत्याची जाण आपसूक होते.

आपल्याला काय करावयास हवे होते ह्याची कल्पना तेव्हा येऊन सुद्धा वेळ व वय निघून गेलेले असते.

म्हणून तुमच्या पाल्यांना :

१) कशात करियर करायचे आहे ते शांतपणे विचारा… त्यांच्यावर लादू नका,

२) त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे ते तपासा,

३) अभ्यास – मेहनत करण्याची किती तयारी आहे ते बघून निवडलेल्या करियर मध्ये तो किंवा ती खरच टिकू शकेल का ह्याचाही विचार करा.

नाहीतर आई किंवा वडीलांसारखा सिव्हिल इंजििअर  झाला पण साईट वर उभे राहून काम करून घेणे जमत नाही किंवा उन्हात – पावसात उभे राहून काम होत नाही म्हणून भविष्यात करियर चेंज करण्याची नामुष्की त्याच्यावर येऊ नये हे बघणे जास्त महत्वाचे आहे.

देवाने प्रत्येक मनुष्य प्राण्याला एका ठराविक उद्दात कार्यासाठी पृथ्वीतलावर धाडलेले असते हे आपण जाणतो म्हणून नियतीच्या संकेताप्रमाणे कार्य केल्यास यश निश्चित मिळेल ह्याची खात्री बाळगा.

अगोदरच्या माझ्या सर्व लेखांना आपला भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलेत, सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

आजचा लेख आपल्याला कसा वाटला ते ही कंमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा.

 

आपल्याला लेख आवडला असल्यास लेखकाच्या सम्पूर्ण माहितीसह फॉरवर्ड ही करू शकता.


Spread the love

One thought on “पालकांची परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page