बरेच वेळा घर घेताना हल्ली प्रधान मंत्री योजनेचा लाभ घेताना अथवा बायकोच्या माहेर कडून फायनान्स मदत मिळाल्या मुळे खास त्यांच्या आग्रहास्तव घर मिसेस च्या नावावर घेतलं जातं नवीन नवीन लग्न झाल्यावर कारण नविन घरांच्या किमती ही गगनाला भिडल्या आहेत.
अगदी २-३ वर्ष झाली असतील तरी नविन जोडप्याचे फॅमिली प्लॅनिंग च चालू असते व मध्येच हुक्की येते की आपलं ही स्वतःच घर घ्यायला हवं. असंच एक जोडपं घर घेण्याचे योग् विचारायला आलं होतं. घर मिसेस च्या नावावर घ्यायचं होतं कारण तिच्या माहेर कडून च मदत मिळाली होती. म्हनून जातकाच्या मिसेस ची पत्रिका बघितली. मंगल, शनी व शुक्र सुस्थितीत च होते वरती मंगळाची दशा ही चालू होती. चतुर्थ स्थान कार्यरत होतेच म्हणून घर कधी पर्यंत होईल ह्याचा कालावधी सांगितला. येणाऱ्या ६-७ महिन्यात च घर घेण्याचा योग् ह्या जोडप्याला होताच त्याच्यातच जातकाची मिसेस प्रेग्नंट आहे हे ही प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर जातकाने सांगितलं. दोघांच्या कुंडलीत संतत्ती साठी उपयुक्त असे पंचम स्थान ही कार्यरत होतेच. पण चतुर्थ म्हणजे पंचमाचे व्यय नाही का. मी स्पष्ट सांगितलं की घर घ्याल तर मिसेस च्या नावावर न घेता तुमच्याच नावावर घ्या नाहीतर अघटित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जातकाने नकारघंटा वाजवली.
दुसऱ्या वेळेस घरात वास्तुशांती चा मुहूर्त विचारायला तेच जातक पुन्हा आल्यावर त्यांनी एक सुखद व एक दुःखद बातमी दिली. जातकांचे घर तर झाले होते पण संतत्ती…? नाही राहिली.
लेख लिहिण्याचे कारण की हल्ली घर हे मिसेस च्या नावावर करतात सासरच्या आग्रहावरून (चांगलीच गोष्ट) पण कधी कधी चालू दशा ही इतकी विचित्र अनुभव सुद्धा देऊन जाते ह्याची सर्व मुलींच्या पालकांनी नोंद घ्यायला पाहिजे. शक्यतो प्रेग्नंट असताना घर घेणे नक्कीच टाळावे.
आपल्याला असा कधी अनुभव आला आहे का?
ज्योतिषी: कौशिक घरत
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय
(कृष्णमूर्ती, फलज्योतीष व भावनवमांश पद्धतीचे अभ्यासक)
मोबाईल/व्हाट्सअप्प नंबर: 9833737919