आपण लग्न जुळविताना शक्यतो गुणमेलन करून 18 पेक्षा जास्त गुण जुळत असतील तर लग्न जुळवतो परंतु केरळ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार अगदी 36 गुण जुळत असणाऱ्या जोडप्यांमध्ये घटस्फोट चे प्रमाण जास्त दिसून आले आहे. माझ्याकडे येणाऱ्या जातकाना मी स्वतःच गुणमेलन कसे करायचे हे शिकवतो परंतु वधू व वराची पत्रिका जुळविताना मुख्यत्वे भर हा दोघाचं भविष्यातील वैवाहिक जीवन, दोघांचं संतती योग, आरोग्य व आयुष्य मर्यादा व साहजिकच स्वभाव ह्यावर असतो.
लग्न करणाऱ्या दाम्पत्याचे जर वैवाहिक जीवन नीट नसेल तर वारंवार तणाव, खटके उडणे, घटस्फोट वा एकाध्याचा मृत्यू ही ओढवू शकतो. जसे की लग्न झाल्या नन्तर अगदी 3 महिन्यांनी पतीचा मृत्यू होणे, इ.
ज्योतिषाने सर्व काही स्पष्ट असेल ते सांगावे, जास्त फी मिळते म्हणून कोणत्याही पत्रिकेला जुळवू नये कारण माझ्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे जर काही विपरीत घडले तर सर्वात जास्त पाप हे ज्योतिषास लागते. चांगले स्थळ जाऊ नये म्हणून हल्ली वधू वर पक्षाचे मायबाप खोटी पत्रिका बनवितात हे सर्वस्वी चुकीचे आहे कारण पुढे होणाऱ्या अनहोनीस फक्त तेच जबाबदार होतात व सरते शेवट त्यानाच काळजी वाहावी लागते. त्यामुळे प्रसिद्धि, पैसा, पद न पाहता प्रत्येकाने फक्त वरील बाबी योग्य जुळत असतील तरच विवाह करावा कारण माया ही क्षणभंगुर असते.
कधी कधी पत्रिकेतील मंगळ दोषास उगाच भीतीदायक बनविले जाते परंतु काही योगात मंगल नसलेल्यांपेक्षा ही मंगल काही विशिष्ट स्थानात असल्यास ही मंगळा सारखाच खराब योग निर्माण झालेला असतो उदा. बाधक स्थानातील, क्रूर नक्षत्रातील मंगळ, इ., क्रूर नका मंगळावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, कोणता ग्रह मंगळापासून कोणत्या स्थानात असेल तर मंगळ दोष होत नाही असे जावई शोध ही कित्येक जणांनी लावलेले आहेत परंतु वाचकांनी सुज्ञ पणाने निर्णय घ्यावा. मंगळ शांती ही काही लोक करतात पण पत्रिकेतल्या मंगळावर त्याचा काही परिणाम होत नसतो.
एक नाडी दोष: एक नाडी दोष असल्यास संतती न होण्याच्या भीतीपोटी लग्न करत नाहीत पण नवमांश पद्धतीने संतती योगाचा सूक्ष्म अभ्यास केल्यास लग्न करण्यास हरकत नाही. त्यांची मुलं निश्चित च होतात फक्त थोड्या काळाच्या फरकाने. उलट अनुभवानुसार असे दिसून आले आहे लग्न/जन्म राशी चा षडाषटक योग् असलेल्या दाम्पत्याना कोणताही शारीरिक उणीव नसता ही संतती होत नाही. निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येईल की एक नाडी असलेल्या जोडप्यांची रक्त गट ही सारखे असतात त्यामुळे वैद्यकीय शास्त्रा नुसार जन्म होणारे बाळ व्यंग असलेलं होते परंतु त्यासाठी उपाय आता कुठलीतरी इंजेक्शन शोधलं आहे जे प्रेग्नन्सी च्या वेळेस देतात.
शनी, राहू, रवी ग्रह जर मारक बाधक स्थानात असतील व येणाऱ्या दशे च्या परिणामाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीस जर काही गंभीर आजार होतील का ते पाहता येते. उदा. जर नवराबायको ना दोघाना जर गंभीर आजार झाले तर कोण कोणाची सुषुश्रा करणार तेव्हा दोघानपैकीं एक तरी धडधाकट असायला हवा. त्यामुळे आरोग्य ही सुध्दा मुख्य बाब समजावी विवाह जुळविताना.
आपल्या ऋषीमुनींनी अगदी सखोल अभ्यास करूनच विवाह जुळविण्याचे काही नियम ज्योतिष शास्त्रात बनवून ठेवले आहेत कारण त्यांच्यानुसार विवाह हा दोन चाकांवर चालणाऱ्या बैलगाडीसारखाच असतो. दोन्ही ही चाक मनमिळाऊ, मदत करणारे असावेत कारण जर का एकास काही संकट आलेच तर दुसरा त्याची काळजी घेईल अन्यथा …
💎अगोदरच्या माझ्या सर्व लेखांना आपला भरभरून प्रतिसाद दिलात,
प्रेम दिलेत, सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेत त्याबद्दल मी आपला
आभारी आहे.
📝आजचा लेख आपल्याला कसा वाटला ते ही कंमेंट्स च्या माध्यमातून
नक्की कळवा.