बाळाच्या जन्माचा मुहूर्त !!!

Spread the love

ह्याच आठवड्यात एका जुन्या जातकांनी विचारलं की दुसऱ्या बाळासाठी मुहुर्त काढून द्याल का ? सिझेरियन करायचे आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितले आहे की कधी करायचे ते तुम्ही ठरवू शकता.

 

मी शक्यतो नैसर्गिक नियमांच्या विरोधात कधीच जात नाही पण जातक नेहमीचे होते म्हणून म्हटलं की आई आणि बाळासाठी च्या आरोग्यासाठी जो चांगला मुहूर्त असेल तो सांगू शकेन.

 

आपल्याला माहीत असेल की सप्तमावरून द्वितीय संतत्ती बघतली जाते. लाभ, सप्तम व दशा व रवी-चंद्र- मंगळाचे गोचर बघून असा मुहूर्त देता येतो.

 

तसेही हे एक टेस्ट ट्यूब बेबीच होतं.

 

त्यानी चान्स घेण्याअगोदर पण मला प्रश्न विचारला होता की दुसरी संतत्ती साठी चान्स घ्यायचा आहे तर घेऊ का? बाळाच्या आईच्या पत्रिकेत सध्या द्वितीय संतत्ती चे योग बरे नव्हते म्हणून नको म्हटलं पण ऐकणार  तो जातक कसला. त्यांनी चान्स घेतलाच.

 

✍ पंचमाचे  व्यय स्थान, षष्ठ, अष्टम स्थान, इत्यादी संतत्ती बद्दल अशुभ फळं देतात. अशा वेळेस संतत्ती जाण्याचा धोका असतो, अचानक गर्भपात होण्याचे चान्सेस असतात म्हणून तशा दशा व गोचर बघून मी खरं तर टाळण्याचाच सल्ला दिला होता. पण काही जातकांना वाटतं की टेस्ट ट्यूब बेबी असेल तर असं काही होत नाही पण प्रत्यक्षात दशेची फळं भोगावीच लागतात.

 

मनुष्याने कितीही मोठे मोठे शोध लावले तरी शेवटी आपली शेंडी त्या परमेश्वराकडेच असते. आपण नीट निरीक्षण केलेत तर असं पण आढळून येते की सर्वच टेस्ट ट्यूब प्रयोग यशस्वी होत नसतात. कारण जर मूळ पत्रिकेत संतत्ती चा योगच नसेल तर कितीही प्रयत्न करा सर्व निष्फळ. अशा जातकांना कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक अडचणी उदभवतात व त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी प्रयोग यशस्वी होत नाही. ज्यांना संतत्ती योग काही कारणांमुळे विक झालेला असेल त्यांनाच ह्याचा फायदा झालेला दिसून येतो.

 

✍ काही जातक प्लॅन करून खूप चांगले योग बाळाच्या  पत्रिकेत येतील असे मुहूर्त काढून सिझरीयन डिलीव्हरी करतात ही. तशा एक दोन पत्रिका मी ही बघितल्यात खूप वर्षांअगोदर पण जरी त्या कुंडलीत चांगले योग दिसत होते तरीही प्रत्यक्षात त्या बाळाची ( व्यक्तीची म्हणणे योग्य होईल) प्रगती तशी झालेली आढळून येत नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.

 

🔰 डॉक्टर्स व ज्योतिर्विदानी एकत्र येऊन ह्यावर अभ्यास करणे गरजेचे वाटते.

 

तरीही जेवढे शक्य होईल तेवढे निसर्ग नियमांचे पालन करूनच डिलीव्हरी करावी म्हणजे विसंगती टाळता येऊ शकते.

 

आपल्यालाही असे काही अनुभव आलेले आहेत का ???


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page