Spread the love

खूप खूप वर्षां अगोदरची गोष्ट आठवली की अक्षरशः हसू आवरत नाही. ही गोष्ट तशी जुनीच जेव्हा मी ज्योतिष शास्त्र शिकत होतो तेव्हाची, त्यानंतर ही बरेच असे प्रश्न बघितले पण ती घटना काही औरच!

जसं विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना एखादे सूत्र शिकविल्या नंतर त्याची प्रॅक्टिकल करून बघावी लागते अगदी तसेच मी शास्त्राचे नियम प्रत्यक्षात वापरून बघत असे..अजूनही बघत असतो,  त्याने भविष्य कथनात अचूकता यायला फार फायदा होतो. आमच्याच घराबाजूला राहणारे दोन माझे छोटे मित्र एक दिवस मी पत्रिका बनवत बसलो असताना अचानक आले होते. त्यातील एकाने नुकतीच दहावी ची परीक्षा दिली होती व रिझल्ट ला अजून दोन महिने होते. त्यानेच प्रश्न विचारला “दादा, सांग बघू मला किती टक्के % मार्क्स मिळतील दहावी च्या परीक्षेत?

ही तशी माझीच परीक्षा होती मार्क्स सांगण्याची. मी प्रश्नकुंडली मांडली व त्यावेळेचे रुलिंग प्लॅनट्स पाहून सांगितले ही की तुला ४५.५०% टक्के मिळतील. त्याला ते न पटणारे होते कारण आता पर्यंत त्याला पार नववी पर्यंत ७५% टक्के पेक्षा ही जास्त मार्क्स मिळाले होते वर तो एका माध्यमिक शिक्षकाचा मुलगा ही होता.

मी ही त्यावेळेस टेन्शन मध्ये की काय होईल माझ्या भविष्य कथनाचं… बरोबर येईल की चूक? पण माझा शास्त्रावर व माझ्या गुरूंवर त्यावेळेस ही नितांत श्रद्धा होती. मला माहित होते की ज्योतिष शास्त्रा चे नियम सहजासहजी चुकणार नाहीत व जर चुकलेच तर आपण कुठे नियम वापरण्यात चुकलो हे शोधून काढायला हवे.

 आता माझी भूमिका फक्त  वेट अँड वॉच ची च  होती त्याचा रिझल्ट लागे पर्यंत.

एक दिवस त्याची आई  कपडे वाळत घालण्यासाठी अंगणात आली  व खालच्या काकूं सोबत मोठमोठ्याने बोलत होती “अहो काय विचारता किती मार्क्स मिळाले म्हणून माझ्या मुलाला?…त्याने सांगितलं होत ना ४५.५०% टक्के मिळतील तेव्हढेच मिळाले” (हे सर्व रागाने बरं का…).☺

 ऐकत होतोच खिडकीत उभा राहून. संध्याकाळी मी त्याच मुलाला गाठुन विचारले की किती  टक्के मिळाले व  खात्री ही करून घेतली त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धती वरचा विश्वास अधिक अधिक दृढ झाला.

मजेची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच मी कोणाचे तरी मार्क्स सांगितले होते… पण रुलिंग प्लॅनट्स चा वापर करून ते अगदी पॉईंट (.५०) पर्यंत अचूक आले होते हे माझ्या साठी नवलच!

टीप: हल्ली जातक मुलांचे मार्क्स त्यांची परीक्षा होण्याअगोदर च मला विचारतात पण अहो जरा धीर धरा…घटना तर घडू द्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करा पण मार्क्स वरून  त्यांना टॉर्चर करणं/ दुसऱ्याशी तुलना करणं आता तरी सोडा.

ज्योतिषी: कौशिक घरत

श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय

(कृष्णमूर्ती, फलज्योतीष व भावनवमांश पद्धतीचे अभ्यासक)

व्हाट्सअप्प नंबर: 9833737919


Spread the love

4 thoughts on “दहावी ला किती टक्के मार्क्स मिळतील?

  1. आतिशय छान आनुभव सांगितलात. शास्त्रावर श्रद्धा आणि अचूक नियम वापरलेत की उत्तर चुकीचे येतच नाही. हिच तर कृष्णमुर्ती पद्धतीची खासियत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page